Vi चा मोठा धमाका! भारतात पहिल्यांदाच आणला प्रीपेड फॅमिली प्लॅन, यूजर्सना मिळणार हे फायदे
‘वी’ ने लाँच केलेला प्रीपेड फॅमिली प्लॅन पारंपारिक प्लॅन्सपेक्षा खूप वेगळा आहे. भारतातील पहिलाच असा हा प्लॅन ज्याचा लाभ घेऊन कुटुंबातील सदस्य देशात कुठेही राहून एकमेकांसोबत डेटा शेअर करू शकतात. हे नवीन वैशिष्ट्य पारंपारिक प्रीपेड अनुभवात बदल घडवून आणते. याद्वारे ग्राहक सहजपणे डेटा शेअर करू शकतात. उदाहरणार्थ, जर कुटुंबातील एखाद्या सदस्याचा डेटा संपला असेल किंवा कमी डेटा शिल्लक असेल, तर त्याला सहज डेटा शेअर करण्याची सुविधा ग्राहकांना मिळते.
सध्याच्या काळात इंटरनेट डेटा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. कारण जर अचानक डेटा संपला तर डिजिटल सोयीसुविधांचा वापर करण्यात अडथळे येऊ शकतात. इंटरनेट डेटाशिवाय व्हिडिओ कॉल, ऑनलाइन क्लासम, मॅप्स किंवा आवश्यक ॲप्सचा वापर केला जाऊ शकत नाही. अशावेळी आपण आपल्या कुटूंबातील सदस्यांना मदत करत त्यांच्यासोबत मोबाईल डेटा शेअर करतो. मात्र आता ‘वी प्रीपेड फॅमिली प्लॅन’ हे चित्र बदलत आहे.
सर्व ॲक्टिव्ह ‘वी’ प्रीपेड ग्राहक ‘वी’ ॲपचा वापर करून चार सदस्यांपर्यंतचा एक फॅमिली ग्रुप तयार करू शकतात. या ग्रुपमध्ये एक मुख्य सदस्य आणि इतर तीन सदस्य असतील. प्रत्येक सदस्य आपला मूळ प्रीपेड प्लॅन आणि त्याची वैधता कायम ठेवेल, तसेच त्यांना डेटा शेअर करण्याची आणि आपल्या कुटुंबाशी संपर्कात राहण्याची सुविधाही मिळेल. ‘वी’ प्रीपेड फॅमिली’चे सदस्य, ज्या कुटुंबातील सदस्याचा डेटा संपला आहे किंवा कमी झाला आहे, त्यांना ५०० MB डेटा शेअर करू शकतात, ज्यामुळे त्यांना ऑनलाइन राहण्यास मदत होते. याशिवाय, फॅमिली ग्रुपमधील प्रत्येक सदस्याला ‘वी’ ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या प्रत्येक रिचार्जवर १० टक्क्यांपर्यंत खात्रीशीर डिस्काउंट मिळेल.
नव्या धमाक्यासाठी सज्ज व्हा! Vivo चा नवा स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री… BIS वर झाला स्पॉट
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांचा समावेश असलेली नवीन जाहिरात मोहीम या प्लॅनची प्रमुख वैशिष्ट्ये आणि ब्रँडचे आश्वासन अधोरेखित करते ‘वी पे सब है व्हीआयपी’. या जाहिरातीत, शाहरुख खान स्पष्ट करतात की हा ‘वी’ प्रीपेड प्लॅन कसा भारतातील विविध शहरांत राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांना एकमेकांशी सदैव जोडलेले ठेवतो. ग्राहक वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समधूनही आपला फॅमिली ग्रुप तयार करू शकतात, पात्र कुटुंब सदस्यांना यात जोडू शकतात, आणि डेटा शेअरिंगसह फॅमिली मॅनेजमेंट तसेच विशेष रिवॉर्ड्सचा आनंद घेऊ शकतात.
Ans: Vi Prepaid Family Plan ही प्रीपेड ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलेली सुविधा आहे. यामध्ये कुटुंबातील सदस्य एक फॅमिली ग्रुप तयार करून एकमेकांसोबत मोबाईल डेटा शेअर करू शकतात.
Ans: या प्लॅनमध्ये एका फॅमिली ग्रुपमध्ये जास्तीत जास्त 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. यामध्ये एक प्रायमरी मेंबर आणि तीन सेकंडरी मेंबर्स असतील.
Ans: कुटुंबातील ज्या सदस्याचा डेटा संपला आहे किंवा कमी पडत आहे, त्याला एका वेळी 500MB डेटा शेअर करता येतो.






