

परदेश प्रवासादरम्यान मोबाईल डेटाचा वापर करणं आणखी सोपं
सध्या फीचरची चाचणी सुरु
व्हॉट्सअॅप फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.47.10 मध्ये एक ट्रॅव्हल ईसिम फीचर मिळण्याची शक्यता
व्हॉट्सअॅप लवकरच एक नवीन फीचर घेऊन येणार आहे. हे फीचर परदेशात प्रवासादरम्यान अत्यंत फायद्याचे ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपच्या मदतीने परदेश प्रवासादरम्यान मोबाईल डेटाचा वापर करणं आणखी सोपं होणार आहे. कारण सध्या हे मेसेजिंग प्लॅटफॉर्म एका ट्रॅव्हल ईसिम फीचरवर काम करत आहे.
नव्या व्हॉट्सअॅप फीचरच्या मदतीने यूजर्सना त्यांच्या गंतव्य स्थानाच्या आधारावर डेटा प्लॅन्स शोधणं, अॅपद्वारे ईसिम इंस्टॉल करणं आणि त्यांचे प्लॅन्स ट्रॅक करण्याची सुविधा मिळू शकते. तसेच व्हॉट्सअॅप यूजर्सना प्रवास सुरु करण्यापूर्वी ईसिम इंस्टॉल करणं आणि गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर ईसिम चालू करण्याचा पर्याय देखील मिळू शकतो. सध्या या फीचरची चाचणी सुरु आहे. हे फीचर यूजर्ससाठी कधी जारी केले जाणार, याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)
अँड्रॉईड ऑथोरिटीद्वारे शेअर करण्यात आलेल्या एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप फॉर अँड्रॉईड वर्जन 2.26.47.10 मध्ये एक ट्रॅव्हल ईसिम फीचर मिळण्याची शक्यता आहे. अॅपच्या कोडमध्ये मिळालेल्या स्ट्रिंग्सद्वारे संकेत मिळत आहेत की, यूजर्स त्यांच्या गंतव्य स्थानानुसार ईसिम प्लॅन्स शोधू शकतात, ज्यामध्ये रीजनल आणि ग्लोबल प्लॅन्स, फिक्स्ड डेटा लिमिट आणि अनलिमिटेड डेटा सारखे ऑप्शन्स समाविष्ट असणार आहेत. हे ॲप सेटअपच्या सूचना देखील दाखवू शकते आणि अँड्रॉइडच्या ई-सिम इन्स्टॉलेशन प्रक्रियेशी जोडले जाऊ शकते, ज्यामध्ये यशस्वी आणि अयशस्वी इन्स्टॉलेशनसाठी नोटिफिकेशनचा समावेश असेल.
यूजर्स प्रवास सुरु करण्यापूर्वी ई-सिम इंस्टॉल करू शकतात आणि त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचल्यानंतर अॅक्टिव्हेट करू शकतात. यानंतर जेव्हा यूजरचा फोन स्थानिक नेटवर्कला जोडला जाईल, तेव्हा हे प्लॅन्स आपोआप कनेक्ट होतील आणि प्लॅन्स वापरण्यासाठी तयार झाल्यावर व्हॉट्सॲप यूजर्सना नोटिफाय देखील करणार आहे. प्लॅनमध्ये किती डेटा शिल्लक आहे आणि प्लॅन कधी संपणार आहे, याबाबत देखील अलर्ट पाठवले जाऊ शकतात.
आगामी व्हॉट्सअॅप फीचरचा वापर करण्यासाठी ईसिम असलेले अँड्रॉईड फोन्स, ऑपरेटिंग सिस्टमचे लेटेस्ट वर्जन आणि फोनमध्ये उपलब्ध eSIM स्पेस असणं गरजेचं आहे. कॅरियर-लॉक असलेल्या डिव्हाइसेसवर कदाचित यासाठी सपोर्ट मिळणार नाही. कोडमधील 'Powered by' या उल्लेखावरून असेही संकेत मिळत आहेत की, व्हॉट्सॲप एका बाह्य ई-सिम प्रदात्यासोबत भागीदारी करत असावे, मात्र त्या कंपनीची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही.
आगामी व्हॉट्सअॅप फीचर कधीपर्यंत रिलीज केले जाईल, याची कोणतीही माहिती शेअर करण्यात आली नाही. सध्या हे फीचर डेवलपमेंट स्टेजमध्ये असल्याचे सांगितलं जात आहे, त्यामुळे यूजर्सना या फीचरचा वापर करण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागू शकते.