IPL 2026: दुखापतीमधून सावरून आज खेळण्यासाठी आलेला लुंगी एनगिडीने थेट कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट पटकावली. तर कर्णधार अक्षर पटेलने उर्वील पटेलला आउट केले.
चेपॉकचे स्टेडीयम क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध स्टेडियम आहे. आतापर्यंत या स्टेडियमवर आयपीएलचे 92 सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा जास्त फायदा होतो.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे, या सामन्याचे आयोजन चेन्नईच्या चेपॉक मैदानावर करण्यात आले आहे. या सामन्यात चेन्नईच्या संघात अलिकडच्या कामगिरीबद्दल निश्चितच चिंता असेल.