DC Vs CSK Pitch Report (फोटो- ians)
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स
एम. धोनी खेळणार का याकडे सर्वांचे लक्ष
चेन्नईचा संघ पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
Tata IPL 2026 CSK vs DC Live Updates: आज चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात (DC vs CSK) सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. दिल्ली कॅपिटल्स सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर चेन्नईला अजून विजयाचे खाते उघडता आलेले नाही. दरम्यान आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट काय आहे ते जाणून घेऊयात.
आयपीएलचा रणसंग्राम सुरू झाला आहे. जसजशी स्पर्धा पुढे जात आहे, तसा स्पर्धेचा उत्साह वाढत आहे. मात्र चेन्नईच्या संघासाठी अजूनही आनंदाचा क्षण आलेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. मात्र एकाही सामन्यात त्यांना विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे आज चेन्नईसाठी करो या मरो स्थिती असणार आहे.
चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सने मागचा सामना 1 रन्सने गमावला आहे. त्यामुळे आज दिल्ली देखील सामना जिंकून गुणतालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल.
दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट
चेपॉकचा पीच रिपोर्ट काय सांगतो?
चेपॉकचे स्टेडीयम क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध स्टेडियम आहे. आतापर्यंत या स्टेडियमवर आयपीएलचे 92 सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा जास्त फायदा होतो. पहिल्यांदा फलंदाजी करताना या ठिकाणी 51 सामने जिंकले गेले आहेत. रन्सचा पाठलाग करतानाया या मैदानावर 41 सामने जिंकले गेले आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना 160 ते 70 इतक्या धावा होऊ शकल्या आहेत.
मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन्स झाल्या होत्या. त्यामुळे आज देखील जास्त रन्स होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी स्पिनर्सला मदत मिळते. त्यामुळे आजचा सामना जबरदस्त असा होणार आहे. आजचे चेन्नईचे हवामान साफ आणि मोकळे राहणार आहे. पावसाची शक्यता असली तरी त्यामुळे सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.
यंदा CSK चं खरं नाही! MS Dhoni लवकरच मैदानात? समोर आली महत्वाची अपडेट
दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD?
MA चिदंबरम स्टेडियमवर सीएसके आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत फ्लेमिंग यांनी सांगितले की, धोनी पुनरागमनासाठी कठोर परिश्रम घेत आहे. प्रशिक्षकांनी धोनीच्या पुनरागमनाची तारीख किंवा सामना जाहीर केला नाही, ज्यामुळे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या स्टारला पाहण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागत आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनीच्या दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडल्याची बातमी आली होती.






