DC Vs CSK Live Streaming (फोटो- ट्विटर)
दिल्लीचे कॅपिटल्सचे चेन्नईला 156 रन्सचे टार्गेट
स्टब्स आणि रिझवीने सांभाळला चेन्नईचा डाव
Tata IPL 2026 DC Vs CSK Live Updates: आज दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना पार पडला. दिल्लीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. स्टब्स आणि रिझवीच्या खेळीच्या जोरावर 155 रन्स केल्या. चेन्नई सुपर किंग्जला विजयासाठी 156 रन्सची आवश्यकता होती. अखेर या सामन्यातचेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. सीएसकेने 10 सामन्यांमध्ये आपला 5 वा विजय मिळवला आहे. संजू सॅमसनने आपला फॉर्म कायम ठेवला आहे. त्याच्या जबरदस्त खेळीवर चेन्नईचा विजय झाला आहे.
चेन्नई सुपर किंग्जची फलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सने दिलेल्या 156 रन्सचा पाठलाग करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जकडून फॉर्ममध्ये असलेला संजू सॅमसन आणि कर्णधार ऋतुराज गायकवाड सलामीला खेळण्यासाठी उतरले. दोघांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र कर्णधार ऋतुराज गायकवाड 6 रन्स करून आउट झाला. त्या पाठोपाठ उर्वील पटेल 17 रन्स करून आउट झाला. संजू सॅमसन आणि कार्तिक शर्मा यांनी जबरदस्त अशी भागीदारी करून चेन्नईला विजय मिळवून दिला. संजू सॅमसनने 87 रन्सची खेळी केली.
Calm, composed, and 𝙎𝙖𝙢-𝙨𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙖𝙡! 🔥 2️⃣7️⃣th #TATAIPL half-century for Sanju Samson 👏 Updates ▶️ https://t.co/f1bRZthndy#KhelBindaas | #DCvCSK | @ChennaiIPL | @IamSanjuSamson pic.twitter.com/qoLJg31p9r — IndianPremierLeague (@IPL) May 5, 2026
दिल्ली कॅपिटल्सची गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांना वेगवान खेळी करण्यापासून रोखण्यात काही प्रमाणात यश आले. दुखापतीमधून सावरून आज खेळण्यासाठी आलेला लुंगी एनगिडीने थेट कर्णधार ऋतुराज गायकवाडची विकेट पटकावली. तर कर्णधार अक्षर पटेलने उर्वील पटेलला आउट केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चेन्नईच्या एकही फलंदाजाला आउट करता आले नाही.
DC Vs CSK Live: चेन्नईने रडवलं अन् स्टब्सने चिडवलं; सुपर ‘किंग्ज’ला विजयासाठी 156 रन्सची गरज
दिल्ली कॅपिटल्सची फलंदाजी
अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले केएल राहुल आणि पथूम निसांका हे मैदानात सलामीवीर म्हणून खेळण्यासाठी मैदानात उतरले. दोघांनी दिल्लीला चांगली सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलचा फलंदाजी करण्याचा निर्णय सुरुवातीला काहीसा चुकीचा ठरल्याचे पाहायला मिळाले.
केएल राहुल 12 आणि पथूम निसांका केवळ 19 रन्स करून आउट झाले. त्यामुळे दिल्लीला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. त्यापाठोपाठ करून नायर 13 आणि डावखुरा फलंदाज 15 रन्स करून आउट झाले. स्टब्स आणि समीर रिझवीने दिल्ली कॅपिटल्सची बाजू सांभाळून धरली. ट्रिस्टन स्टब्सने 38 रन्सची महत्वाची खेळी केली. आशुतोष शर्माने शेवटच्या ओव्हर्समध्ये महत्वाची खेळी केली. 9 बॉलमध्ये 14 रन्सची महत्वाची खेळी केली.
चेन्नई सुपर किंग्जची गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्जकडून आज पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अकील हुसेनने केएल राहुलची विकेट मिळवली. मुकेश चौधरीने पथूम निसांकाला आउट केले. त्यापाठोपाठ नूर अहमदने नितीश राणाची विकेट पटकावली. गुर्जनप्रीत सिंगने शानदार गोलंदाजी करत कर्णधार अक्षर पटेलला आउट केले. नूर अहमदने करून नायरला देखील आउट केले.
दिल्ली कॅपिटल्स: के. एल. राहुल (यष्टिरक्षक), पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, समीर रिझवी, अक्षर पटेल (कर्णधार), मिचेल स्टार्क, लुंगी एनगिडी/काईल जेमिसन, कुलदीप यादव, टी. नटराजन.
कितीही पराभव झाले तरी Hardik Pandya च कर्णधार? MI मॅनेजमेंटचा ‘हा’ मोठा निर्णय
चेन्नई सुपर किंग्स: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्वील पटेल, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग.






