hindu person donate top masjid in ayodhya
अयोध्या. अयोध्या येथे उभारल्या जाणाऱ्या धन्नीपूर मशिदीला २१ हजार रुपयांच्या देणगीचा पहिला धनादेश मिळाला आहे. या मशिदीसाठी इंडो इस्लामिक कल्चरळ फाऊंडेशन या ट्रस्टची स्थापना करण्यात आळी आहे. या मशिदीला पहिली देणगी ही लखनऊ येथीळ रोहित श्रीवास्तव यांनी दिली आहे. त्यांनी मशिदीच्या ट्रस्ट कार्यालयात देणगीचा धनादेश जमा केला आहे. रोहित श्रीवास्तव हे लखनऊ विद्यापीठातील विधी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
मशीद उभारण्यासाठी मिळाळेळी ही पहिली देणगी आहे. यापूर्वी ट्रस्टचे सचिव अतहर हुसेन म्हणाले होते की, मशिदीला केवळ प्रामाणिकपणे कमावलेल्या पैशातून देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये विशेषतः वीज चोरी, कर चोरी, लाच, तस्करी, खंडणी किंवा सरकारी कायद्याविरोधात कमावलेले धन घेतले जाणार नाही.
[blurb content=”ही मशीद आधुनिक आर्किटेक्ट डिझाइननुसार उभारली जाणार आहे. मशिदीचे डिझायन जामिया मिलिया इस्लामियाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख प्रोफेसर एस एम अख्तर तयार करणार आहेत. मशिदीचे बांधकाम पारंपारिक मशिदीप्रमाणे नसेल. ही एक आधुनिक मशीद असेल, असे प्रो. अख्तर यांनी सांगितले. प्रख्यात इतिहासकार आणि जेएनयूचे सेवानिवृत्त प्रोफेसर पुष्पेश पंत यांना अयोध्या येथील धन्नीपूर मशिदीच्या संग्रहालय आणि ग्रंथालय विभागाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.”]