Latur : 'आरबीआयच्या पत्राचा नीट अभ्यास करा!' धीरज देशमुखांचा निलंगेकरांना सल्ला

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे.
  • लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील राजकीय संघर्ष तीव्र.

  • संभाजी पाटील निलंगेकर यांनी नियमबाह्य कर्जवाटपाचा मुद्दा उपस्थित केला.

  • धीरज देशमुख यांच्या अपात्रतेची मागणी.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र झाला आहे. नियमबाह्य कर्जवाटप आणि आरबीआयच्या दंडाचा मुद्दा उपस्थित करत निलंगेकर यांनी देशमुख यांच्या अपात्रतेची मागणी केली होती.