लातूरमध्ये कर्जातून सुटका मिळवण्यासाठी गणेश चव्हाणने स्वतःचा मृत्यू बनावट दाखवण्याचा धक्कादायक कट रचला. एका वृद्धाला गाडीत जिवंत जाळले. दोन सिम बंद करून तो फरार झाला, मात्र मैत्रिणीच्या चॅटिंगमुळे प्रकार समोर.
लातूर जिल्ह्यातील चार नगरपरिषद आणि एक नगरपंचायत निवडणुकीत आघाडीमध्ये सुद्धा बिघाडी झालेली आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा, उदगीर आणि रेनापुर येथे काँग्रेस स्वबळावर लढत आहे. तर अहमदपूर आणि औसा येथे महाविकास…
लातूरच्या नाईक चौकात व्याजाच्या वादातून चार जणांनी तरुणावर तलवार, कोयता आणि दगडांनी हल्ला केला. तरुण गंभीर जखमी झाला असून, CCTV मध्ये घटना कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला…
लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील रुद्धा गावात धारदार शस्त्राने पिता-पुत्राची निर्घृण हत्या करण्यात आली. मृतदेह पाण्याच्या टाकीजवळ फेकण्यात आले. या दुहेरी हत्याकांडामुळे गावात भीतीचं वातावरण असून पोलिस तपास वेगाने सुरू आहे.
लातूरमध्ये 'बंटी-बबली' (शरद आणि अंजली जाधव-किनीकर) या जोडीने रेल्वे आणि आयकर विभागाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन ३४ हून अधिक बेरोजगार तरुणांची लाखो रुपयांची फसवणूक केली. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
Latur Farmers News : कर्ज काढून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता फेडीचे मोठे संकट निर्माण झाले आहे. कृषी विभागाकडून नुकसानीचा पंचनामा सुरू असून अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे.
लातूरमध्ये पतीला घरात बंद करण्याच्या सवयीचा वैतागलेल्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने कट रचला. दोघांनी मिळून पतीची हत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून तपास सुरु केला आहे.
लातूरमध्ये तीन कथित आत्महत्या बनावट ठरल्या. पोलिस तपासात उघड झालं की तिन्ही मृत्यू अपघाती होते; सुसाईड नोट्स बनावट लिहून आरक्षणाच्या नावाखाली समाजाला दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला.
लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले तर सोयाबीनसारखी पिके पूर्णपणे हातची गेली आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर तेरणा आणि मांजरा नदीच्या संगमावर असलेल्या औराद शहाजानी येथील नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील हिंपळनेर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कॉलेजच्या फिससाठी असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरले म्हणून मुलानेच वडिलांची निघून हत्या केल्याचे समोर आले आहे.
लातूर जिल्ह्यातील उदगीरमधून एक धक्कदायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका २४ वर्षीय तरुणीवर तिच्या कॉलेजमधील मित्राने लग्नाचे आमिष देत शरीर संबंधाची मागणी केली.
अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यसभेचे खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची मागणी केली आहे.
रेल्वे बोगी कारखान्यासाठी स्थानिक स्तरावर कुशल मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी जिल्ह्यातील आयटीआय आणि पॉलिटेक्निक संस्थांमध्ये आवश्यक ट्रेड्स सुरू करून युवकांना प्रशिक्षण द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
एका धाब्यावर वाढदिवस साजरा करतांना टिश्यू पेपरवरून दोन गटांमध्ये सुरु झालेला वाद थेट दारूच्या बॉटलने तोंड ठेचण्यापर्यंत पोहोचला असल्याचे समोर आला आहे. या संपूर्ण प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल…
लातूर शहरातील मुख्य रस्त्यावर भरधाव वेगाने ट्रिपल सीट स्कुटी चालवणाऱ्या तीन तरुणींना महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने रस्त्यात थांबवून चांगलंच धारेवर धरलं. संबंधित व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.