(फोटो सौजन्य: Instagram)
मुलीच्या जन्माचे जंगी स्वागत
ही घटना बीडमधील दहिफळे कुटुंबात घडल्याची माहिती आहे. चार पिढ्यांनंतर घरात जन्मलेल्या ‘गार्गी’ या मुलीचे आगमन अत्यंत उत्साहात साजरे करण्यात आले. यासाठी संगीत आणि नृत्याचा समावेश असलेली एक भव्य रथयात्रा काढण्यात आली. व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात, एक रथयात्रा काढली जात असल्याचे दिसते. रथात नवजात मुलगी, तिची आई, आजी आणि अन्य नातेवाईक बसलेले असतात. तर रथाच्या समोर ढोलपथक गाणं वाजवत असतं. मोठ्या उत्साहात हा स्वागत समारंभ सुरु असतो जो पाहण्यासाठी रस्त्यावर लोकांची गर्दीही जमते.
View this post on Instagram
मुलीचा जन्म म्हणजे भाग्य…
मिडिया रिपोर्टनुसार, बाळाचे आजोबा लिंबाजी दहिफळे यांनी सांगितले की, “कुटुंबात मुलीचा जन्म होणे हे मोठे भाग्य आहे. इतकी वर्षे आम्हाला मुलगी नसल्याची खंत होती, आणि आज ती इच्छा पूर्ण झाली आहे.” आजोबा लिंबाजी आणि आजी सुरेखा यांनी मुलीचे थाटामाटात स्वागत करुन जगापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले. मुलाच्या जन्माचा जितका आनंद साजरा केला जातो तितकाच आनंद मुलीच्या जन्मावेळीही केला जाऊ शकतो. या घटना सामाजिक पुरोगामी विचारांना मोडून मुलींच्या मूल्याबाबत सकारात्मक संदेश देणारी ठरली. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gossipgiriblogs नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






