(फोटो सौजन्य: X)
जेव्हा पैशांची लालसा क्षमतेहून अधिक वाढते तेव्हा नात्यातील बंध त्यापुढे लहान वाटू लागतात. जमिन-पैशासाठी बहिण-भावामध्ये, भावा-भावामध्ये भांडणं झालेली आपण पाहिली असतील पण जमिनीसाठी वडिलांना मारहाण करण्याची ही घटना खरोखर धक्कादायक आहे. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंदापूरच्या सलीम लॉन्स परिसराजवळचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन मुलांनी आपल्या ६५ वर्षांच्या वडिलांवर काठीने हल्ला केला आणि रस्त्यातच कोणतीही भिती आणि लाज न बाळगता निर्दयीपणे त्यांना मारहाण करायला सुरुवात केली. वडिल वेदनेने कळवळत मुलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करतात पण मुलांच्या त्यांच्यावर दया येत नाही. व्हिडिओच्या शेवटापर्यंत मुलं आपल्या वडिलांना मारताना दिसून येतात. पिडित वृद्धाची ओळख तुकाराम किसन राउत अशी पटली आहे.
वडिलांनी पोलिसात केली तक्रार
मुलांनी मारहाण केल्यानंतर वडिलही यावर गप्प बसले नाही आणि त्यांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन मुलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणात वडिलांच्या तक्रारीच्या आधारे संबंधित मुलांविरोधात गुन्हा दाखल केला गेला आहे. मुलांची ओळख संजय तुकाराम राउत आणि राजेंद्र तुकाराम राउत अशी पटली आहे. मारहाणीच्या व्हिडिओच्या आधारे पोलिस या घटनेचा तपास करत आहे. तथापि, या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, लोभापुढे वडिलांसारखं नातं देखील अर्थहिन ठरतं.
महाराष्ट्र के पुणे जिले में जमीन बेचने से नाराज दो बेटों ने टहलने निकले अपने बुजुर्ग माता-पिता को सरेराह सड़क पर डंडों से पीटा.. वहां से गुजर रहे लोगों ने दपंति को बचाया.. pic.twitter.com/RvfZpRiEQr — Ajay Kumar Dwivedi… (@AjayDwi65357304) September 2, 2026
दरम्यान घटनेचा व्हिडिओ @AjayDwi65357304 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अशी मुलं नसलेली बरी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पैसा लोकांना काहीही करायला भाग पाडतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “वडिलांवर हात उगारताना जरा तरी मनाची लाज वाटायला हवी होती”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






