(फोटो सौजन्य: Instagram)
आता विचार करा, नोटांचा पाऊस होतोय, नोटा आकाशातून खाली पडतायेत मग लोक कशाला थांबतील. शेजाऱ्यांनी आणि खाली उभ्या असलेल्या लोकांनी लगेच महिलेने बाल्कनीतून फेकलेले हे पैसे वेचण्यास सुरुवात केली. फुकटचे पैसे मिळवण्यासाठी लोकांमध्ये गर्दी निर्माण झाली आणि प्रत्येकाने संधीचा फायदा घेत आपले खिसे भरुन घेतले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की पुढे पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. प्राथमिक तपासात असे उघड झाले की, हा केवळ एक बनाव नव्हता; कौटुंबिक समस्या किंवा आजाराबद्दल ऐकल्यानंतर ती महिला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली होती. दुःखाच्या या क्षणी, तिने हा “अनोखा” मार्ग निवडला होता.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, प्राॅपर्टी मॅनेजमेंटने पुष्टी केली की उडवलेल्या या नोटा खोट्या नसून त्या खऱ्या नोटा होत्या. दरम्यान स्थानिक पोलिसांनी आता लोकांना त्यांनी वेचलेले हे पैसे परत करण्याचे आवाहन केले आहे. या घटनेचा व्हिडिओ मात्र आता जगभरात मोठ्या वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओ @dailymail नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून अनेक यूजर्सने या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “अशा गोष्टी माझ्यासोबत कधीच का घडत नाहीत?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जो कोणी पैसे फेकून देईल, त्याला मी काहीच परत देणार नाही.” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ती त्याला त्याचे पैसे साफ करायला मदत करत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






