

केरळ पिरवीच्या निमित्ताने त्यांनी साडी नेसून सायकल चालवली
सायकल चालवण्याचा आपला अनुभव शेअर केला
तिने या देशाला आपले दुसरे घर म्हटले
Dubai Viral Video : सोशल मिडियावर दुबईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ मध्ये दुबईच्या प्रसिद्ध अशा शेख झायेद रोडवर साडी नेसून सायकल चालवणाऱ्या एका भारतीय उद्योजिकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओ मध्ये भारतीय उद्योजिका कांचना नायर यांनी पारंपरिक भारतीय साडी नेसून दुबई राईड 2026 मध्ये आपला सहभाग नोंदवला. त्यांनी यावेळी केवळ भारतीय संस्कृतीची एक सुंदर झलकच दाखवली नाही, तर मल्याळी असल्याचा अभिमानही व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना, कांचना यांनी हा अनुभव अविस्मरणीय असल्याचे म्हटले आहे.
कांचना नायर यांनी त्यांच्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "साडी नेसून केरळ पिरवी साजरी करत आहे आणि दुबई राइडमध्ये अभिमानाने सायकल चालवत आहे!" त्यांनी सांगितले की, केरळ पिरवीच्या निमित्ताने त्यांनी साडी नेसून सायकल चालवली. तसेच आपण एक मल्याळी
स्त्री असल्याचा अभिमान आणि उत्साह देखील दाखवला. त्यांनी या अनुभवाचे वर्णन आनंद आणि अभिमानाने भरलेला एक विशेष क्षण म्हणून लिहले आहे.
नायर यांनी शेख झायेद रोडवर साडी नेसून सायकल चालवण्याचा आपला अनुभवही शेअर केला. तिने स्पष्ट केले की, दुबई राइड 2026 दरम्यान, ज्या रस्त्यावर रोजच्या जीवनात वाहने ताशी 120 किलोमीटर वेगाने धावतात, तिथे सायकल चालवणे हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव होता. तिने या अनुभवाला अविस्मरणीय म्हटले आहे.
आणखी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये, कांचनाने संयुक्त अरब अमिराती (UAE)बद्दल आपले प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली. युएईच्या 55 व्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने, तिने या देशाला आपले दुसरे घर म्हटले. तिने दुबई रनमध्ये सहभागी झाल्याचा अभिमानाने उल्लेख केला आणि सांगितले की, तिने उचललेले प्रत्येक पाऊल त्या देशाला समर्पित होते, ज्याने तिला संधी, सामर्थ्य आणि असंख्य आठवणी दिल्या आहेत.
तिने लिहिले की, युएई तिच्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान ठेवेल. कांचनाच्या पोस्टमध्ये भारतीय परंपरा, मल्याळी ओळख आणि दुबईशी असलेले तिचे नाते यांचा संगम दिसून येतो. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. या भारतीय महिला उद्योजिकेच्या या अनोख्या शैलीने प्रत्येकजण प्रभावित झालेला दिसतो.