(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये एका लहान रस्त्याच्या किनाऱ्यावर दोन मुले खेळत असल्याचे दिसते. यावेळी बाजूने एक सायकल पुढे निघून जातेल आणि मग एंट्री होते चारचाकीची. समोर दोन मुले खेळत आहेत याची कल्पना कदाचित कारचालकाला येत नाही, ज्यामुळे कोणताही विचार न करता तो सुस्साट आपली कार पुढे नेतो ज्यामुळे चिमुरडे अपघाताचा शिकार बनतात. दोन्ही मुले कारला धडकून गाडीखाली आल्याने मोठा आवाज होतो आणि काहीतरी गडबड आहे याची जाणीव चालकाला होते. आराडाओरड ऐकल्याने जवळचे लोक आणि मुलांचे नातेवाईक घाबरून त्यांच्या मदतीसाठी धावून येतात. गाडी जागीच थांबलेली असते. स्थानिक मुलांना गाडीखालून बाहेर काढतात आणि त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले जाते.
‘बच्चों को अकेला सड़क पर नहीं छोड़ना चाहिए’ मेरठ में घर के खेल रहे 2 मासूम बच्चों को एक तेज रफ्तार कार ने टक्कर मार दी. दोनों बच्चे कार के नीचे फंस गए. बामुश्किल बच्चों की चीख-पुकार सुनकर पहुंचे परिजनों ने बच्चो को कार के नीचे से निकाला. मौका देखकर कार तब सवार फरार हो गया. घटना CCTV में कैंद हुई है. — Raju Sharma journalist (@RajuSharmajour1) October 10, 2026
या घटनेत कारचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात मुलांना दाखल केले असून सध्या त्यांची परिस्थीती कशी आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान घटनेचा @RajuSharmajour1 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “अरे बापरे, पण कारचालकाला मुले दिसली कशी नाहीत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “कारचालकाचे डोळे काय फुटले होते, नशा करुन तो गाडी तर चालत नव्हता”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “पालकांनी मुलांवर लक्ष ठेवायला हवं”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






