Singapore Metro Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
पण जगात एक अशी पण मेट्रो आहे जिथे तुम्ही साधे पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. जर प्यायला आणि पकडले गेले तर थेट 37 हजार रुपयांचा दंड बसतो. ऐकून विश्वास बसत नाही ना? पण हे खरे आहे.
हा व्हिडिओ anu_amarp नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आला आहे. सिंगापूरमध्ये राहणारा एक मराठी मुलगा हा व्हिडिओ बनवतो. त्याने सिंगापूर मेट्रोचा एक अजब नियम दाखवला आहे.त्याने व्हिडिओत मेट्रोमध्ये लावलेला एक बोर्ड दाखवला आहे. त्या बोर्डवर लिहिले आहे की मेट्रोमध्ये कोणी खाताना किंवा पाणी पिताना दिसले तर त्याला 500 डॉलरचा दंड लागेल.

Singapore Metro Rules: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
500 सिंगापूर डॉलर म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये जवळपास 37 हजार रुपये. फक्त पाणी प्यायल्यामुळे 37 हजार रुपये द्यावे लागतील असा विचार पण आपण करू शकत नाही.सिंगापूरच्या मेट्रोला MRT म्हणतात, म्हणजे मास रॅपिड ट्रान्झिट. तिथे स्वच्छतेबाबत खूपच कडक नियम आहेत. तुम्ही तिथे काही खाऊ शकत नाही, पाणी पिऊ शकत नाही, मोठ्याने बोलू शकत नाही, सिगारेट ओढू शकत नाही. साधी पाण्याची बाटली पण उघडायची नाही. जर नियम मोडला तर दंड तर आहेच पण कधी कधी पुढे कायदेशीर कारवाई पण होते.
M-indicator बनलं WhatsAppचा बाप! मुंबईकरांच्या चॅटचा भन्नाट तडका, वाचून हसू आवरणार नाही
आता प्रश्न असा आहे की पाणी ही तर गरज आहे. समजा प्रवासात अचानक तहान लागली किंवा एखाद्याला चक्कर आली तर काय?याबद्दल लोकांनी खूप प्रश्न विचारले. सिंगापूर मेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दल माहिती दिली आहे.
मेट्रोमध्ये कचरा होऊ नये, स्वच्छ राहावी म्हणून हा नियम काढण्यात आला आहे. जर पाणी खाली सांडले तर कोणाचा तरी पाय घसरून अपघात होऊ शकतो. गर्दीच्या वेळी खाणे पिणे हाताळणे पण अवघड होते. सिंगापूरमध्ये मेट्रोची स्टेशन्स अगदी जवळ जवळ आहेत. त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागत नाही. पुढच्या स्टेशनवर उतरून तुम्ही पाणी पिऊ शकता, असे ते सांगतात. पण तरीही अनेकांना हा नियम थोडा जास्तच कडक वाटतो.आपल्याकडे मुंबई, पुण्याच्या मेट्रोमध्ये असा नियम नाही. तिथे तुम्ही पाणी पिऊ शकता, फक्त कचरा करू नका एवढेच सांगितले जाते.
View this post on Instagram
Darjeelingमध्ये Toy Train आणि स्कूटीची टक्कर! VIDEO पाहून नेटकऱ्यांचं भन्नाट उत्तर, ‘चूक पटरीची!’
पण सिंगापूरमध्ये शिस्त आणि स्वच्छता याला सगळ्यात जास्त महत्व दिले जाते, त्यामुळे तिथे असे कडक कायदे आहेत.तुम्हाला काय वाटते, फक्त पाणी प्यायल्यावर 37 हजारांचा दंड लावणे योग्य आहे का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.






