Viral Video : सोशल मीडियावर व्हायरल (Social media Viral ) होण्यासाठी, लोकं अनेकदा काहीतरी विचित्र करण्याचा विचार करतात जेणेकरून ते प्रसिद्धीच्या झोतात येतील. कधी कधी धोकादायक स्टंटही केले जातात. आता असाच एक अनोखा व्हिडिओ (Viral Video) समोर आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने आपली मारुती कार पूर्णपणे भारतीय चलनाने म्हणजेच एक रुपयाच्या नाण्यांनी झाकून ठेवली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की कारच्या बाहेरील बाजूस शेकडो नाणी अशा प्रकारे चिकटवली आहेत की कारचा खरा रंग दिसत नाही, तर नाण्यांचा रंग कारला दिसत आहे. पुढील आणि मागील नंबर प्लेट आणि काचेच्या खिडक्या वगळता कारच्या संपूर्ण बाहेरील भागावर फक्त नाणी दिसत आहेत. नाण्यांमुळे गाडीचे इतर भाग दिसतच नाहीयेत.
व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले
इंस्टाग्राम यूजर विशाल_एक्सपेरिमेंटकिंग याने 9 एप्रिल रोजी कारचा व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याला आतापर्यंत 31 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये ‘कॉइन वाली कार’ असे लिहिले आहे. पोस्टवर आतापर्यंत अनेक मनोरंजक कमेंट्स आल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, ‘बुलेट प्रूफ’ दुसर्या यूजरने लिहिले आहे की, ‘बिल्ड गुणवत्ता वाढवा’, तर अजून एका यूजरने लिहिले आहे ‘यामुळेच आम्हाला स्टोअरमध्ये सुट्टी मिळत नाही..’