(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक स्कूटी भरधाव वेगाने धावताना दिसते. याचवेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक ट्रक येत असतो. स्कूटी सरळ रस्त्यावर चालत असते तर ट्रक आडव्या मार्गाने मूळ रस्त्यात येत असतो. दोन्ही गाड्यांचा वेग जास्त असल्याने एकमेकांसमोर येताच गाड्यांची मोठी धडक होते. गाड्यांचा वेग अधिक असल्याने बाईक आणि ट्रक चालकाला ब्रेक मारता येत नाही आणि परिणामी दोन्ही गाड्यांची जबरदस्त धडक होते. यात लक्षवेधी गोष्ट म्हणजे, गाड्यांची धडक होताच महिला बाईकस्वार बाईकवरुन हवेत उचलली जाते आणि ती थेट ट्रकच्या पुढच्या बाजूला जाऊन लटकते. ती सुरक्षितरित्या रस्त्यावर उभी राहते ज्यामुळे या अपघातात महिलेला कोणतीही दुखापत होत नाही. ही घटना अहिल्यानगच्या श्रीरामपुर येथे घडल्याचे सांगितले जात आहे.
जाको रखे साईंया मार सके न कोई.. #Maharashtra अहिल्यानगर के श्रीरामपुर के बेलापुर रोड पर एक तेज़ रफ़्तार रेत से भरे ट्रक ने एक स्कूटी को ज़ोरदार टक्कर मार दी..हादसे में स्कूटी पर सवार युवती बाल-बाल बच गई..घटना का चौकानेवाला CCTV आये सामने @TNNavbharat
@NagarPolice https://t.co/e7TjP3sXvc — Atul singh (@atuljmd123) October 10, 2026
महिलेने बचाव आणि अपघातानंतर निर्माण झालेली परिस्थिती सध्या सर्वांना अवाक् करत असून याच्या व्हिडिओने इंटरनेटवर धुमाकूळ माजवायला सुरुवात केली आहे. अपघाताचे दृष्य इंटरनेटवर चांगलेच चर्चेत असून यूजर्सने या व्हिडिओला वेगाने शेअर करण्यास सुरुवात केली आहे. हा व्हिडिओ @atuljmd123 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या यातील दृष्यांवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “ट्रक ड्रायव्हरला शिक्षा झाली पाहिजे किंवा त्याचा परवाना रद्द केला पाहिजे. तो एकेरी वळणावर इतक्या वेगाने ट्रक कसा चालवतो?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ट्रक ड्रायव्हरची ही स्पष्ट चूक होती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्वा, काय चपळाई आहे, तिने स्वतःला वाचवलं”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






