(फोटो सौजन्य: Instagram)
रोबोट आला VVIP पाहुणा बनून! बाउन्सर्सच्या सुरक्षेत केलं सँडविच दुकानाचं उद्घाटन; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओ हा थायलंडमधील असल्याचे सांगण्यात येत आहे. एका थाई वडिलांनी आपल्या मुलीला मदर्स डेच्या दिवशी एकटे वाटू नये यासाठी काही खास करु पाहिले होते. मुख्य म्हणजे ही मुलगी त्यांची स्वत:ची नसून त्यांनी मुलीला दत्तक घेतलेले असते. शाळेत मदर्स डे निमित्त खास कार्यक्रम आयोजिक केलेला असतो ज्यात मुलांच्या आईची उपस्थिती गरजेची असते. आता इतर विद्यार्थ्यांच्या आईला पाहिल्यानंतर निश्चितच मुलीला आपल्या आईची आठवण येऊ लागेल. असे होऊ नये आणि तिच्या मनात एकटेपणाची भावना येऊ नये यासाठी वडिलच आई बनून शाळेत हजेरी लावतात.
व्हिडिओत तुम्हाला वडिलांनी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे दिसते. इतकेच नाही तर खोटे केस देखील त्यांनी लावलेले असते. वडिल महिलेप्रमाणे गेटअप करुन शाळेत जातात आणि मुलीला एक खास सरप्राईज देतात. मुलगी निश्चितच वडिलांचे हे सरप्राईज पाहून खुश होते आणि आनंदाने त्यांना मिठी मारते. ही मिठी प्रेमाची, मायेची असते ज्यात सर्व काही सामावून गेल्यासारखं वाटतं.
View this post on Instagram
फुकट मिळतंय मग काय! हायवेवर फेकलेल्या एक्सपायर्ड चॉकोलेट्सवर नागरिकांचा डल्ला; VIDEO तुफान व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओला आतापर्यंत ३ लाखाहून अधिकचे व्हूज मिळाले आहेत. मुलीच्या आनंदासाठी वडिलांनी घेतलेले प्रयत्न पाहून यूजर्स भावूक झाले असून अनेकांनी वडिलांच्या कृतीवर काैतुकांचा वर्षाव केला आहे. एका यूजरने म्हटले की, “का माहिती नाही पण हे पाहून मला रडायला आलं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याने तिला जन्म दिला नाही पण तो तिचा खरा बाबा आहे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आयुष्यात फक्त इतके एफर्स घेणारा नवरा भेटायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






