(फोटो सौजन्य: X)
काय दिसलं व्हिडिओत?
बऱ्याच काळापासून भावाचा चेहरा न पाहिलेल्या बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या भावाची भेट घेता आली. तुरुंगातच त्यांनी भावाची भेट घेतली, त्याची विचारपूस केली आणि टिळक लावत त्याच्या मनगटावर राखी बांधली. ही राखी म्हणजे भावा-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखली जाते. ही घटना आपल्यासाठी लहान असली तरी अनेक महिने भावांना न भेटणाऱ्या बहिणींसाठी एक आठवणीचा क्षण होती. व्हिडिओत काही बहिणी भावाच्या भेटीने आनंदात रडताना दिसल्या तर काही भावांच्या डोळ्यांतून बहिणींना पाहून आनंदाश्रू वाहताना दिसले.
सेनीपत कारागृहाने रक्षाबंधनानिमित्त तुरुंगात विशेष व्यावस्था करुन ठेवली होती. बहिणींसाठी तुरुंगात आरतीचे ताट, टिळक लावण्यासाठी कुंकु तर मिठाईचीही सोय करण्यात आली होती. सर्वांनी परंपेरनुसार, भावाचे औक्षण केले, त्याला टिळक लावला, भावाच्या मनगटावर राखी बांधली आणि मिठाई खाऊ घालत नात्यातील गोडवा वाढवला. दरम्यान हे सर्व करतानाही अधिकाऱ्यांनी सुरक्षेचीही खास काळजी घेतली होती. सुरक्षा तपासणीनंतरच बहिणींना जेलच्या आत प्रवेश देण्यात आला. रक्षाबंधनासाठी कारागृहाच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत बहिणींना त्यांच्या भावांना भेटण्याची आणि राखी बांधण्याची परवानगी देण्यात आली होती.
Raksha Bandhan took an emotional turn at Lajpore Jail in Surat 💔 😭 pic.twitter.com/8nskmCRc1z — Sunil Goriya (@Sunil_Goriyaa) August 28, 2026
‘मला वाचवा…’ सरकारी रुग्णालयात गर्भवतीचा आक्रोश, प्रसूतीदरम्यान मायलेकाचा मृत्यू; Video Viral
सेनीपत कारागृहातील रक्षाबंधनाचे हे दृष्य भावा-बहिणाच्या नात्यातील भावनिक सार दाखवून देते. अशा प्रकारे कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतही रक्षाबंधनाचा सण भावंडांसाठी भावनिक आणि अविस्मरणीय ठरला. जेलच्या भिंती आणि सलाखाही भावा-बहिणीच्या प्रेमाला रोखू शकल्या नाहीत, हेच या क्षणांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






