शोभायात्रेत उडाला गोंधळ! महादेवाची भूमिका साकारणारा तरुण अचानक खाली कोसळला अन्...थरारक Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ पाहायला मिळतात. यामध्ये डान्स रिल्, स्टंट आणि जुगाडाचे व्हिडिओ, भांडणाचे व्हिडिओ अशा अनेक प्रकारच्या गोष्टी पाहायला मिळतता. तसेच थरारक मृत्यूचेही व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अलीकडे लोकांमध्ये तरुण वयातच हृदयविकाराच्या झटक्याचे आणि यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. सध्या उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिह्ल्यात अशीच एक घटना घडली आहे.
सध्या याचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका रॅलीदरम्यान डीजेसमोर काही तरुणी नाचत होत्या. वेगवेळ्या देवाच्या भूमिकेत डान्स सुरु होता. यावेळी महादेवाची भूमिका साकारणार तरुण खाली बसला आणि अचानक कोसळला. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता.
त्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्याक आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. सांगितले जात आहे की, तरुणाचा हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला होता. तमकुहीराजमध्ये यात्रा सुरु होती. यावेली छत्रपती महाराज मैदानावर ही घटना घडली. यावेळी शोभायात्रेदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. रामबहल असे या तरुणाचे नाव सांगण्यात येत आहे.
बाप रे! महिलेने हजारो फूट उंचीवर पॅराग्लायडिंग करताना वाजवला DJ; VIDEO तुफान व्हायरल
– ये सिलसिला नहीं थमने वाला! अब ‘भगवान शंकर’ भी इसकी चपेट में आ गए…
—–
– कुशीनगर में डोल मेले की झांकी निकल रही थी। डीजे की धुन पर कलाकार झूम रहे थे। अचानक भगवान शंकर बना युवक स्टेज पर गिरा और मौत हो गई। पता चला साइलेंट हार्ट अटैक आया था। #silentheartattack… pic.twitter.com/wRVOkbLZt7— Vaibhava Pandey (@VaibhavaPandey) August 28, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @VaibhavaPandey या अकाउंटवर शेअर करुन या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकजणांनी डीजेच्या मोठ्या आवाजामुळे त्याला झटका आला असणार असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत व्हायरल होत आहे.
थरारक! मगरीच्या पिल्लावर तुटून पडला सिंहाचा कळप; एकाने पाय धरला, एकाने जबडा अन्…, Video Viral
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.