Paneer Viral Video : चाकूने कापले नाही पनीर, मग आणावी लागली आरी! व्हिडिओ पाहून नेटकरी चक्रावले

सोशल मीडियावर पनीर चाकूऐवजी आरीने कापतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पनीर इतके लाकडा सारखे दिसत असल्याने नेटकरी आश्चर्य व्यक्त करत असून त्याच्या गुणवत्ता आणि बनावटीबाबत प्रश्न उपस्थित करत होत आहेत.
Paneer Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Paneer Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया Paneer Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Published on: 
Updated on: 
  • पनीरसारखा मऊ पदार्थ आरीने कापताना पाहून नेटकरी हैरान

  • चाकूने कापले नाही पनीर, मग आणावी लागली आरी

  • व्हिडिओमध्ये दिसणारे पनीर इतके कडक का ?

Paneer Viral Video : सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल. काही जण तर या व्हिडिओ वर मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत. नेमके हा व्हिडिओ व्हायरल होण्यामागचे कारण काय ? तर या व्हिडिओ मध्ये एक माणूस चक्क पनीर चाकूने सहज कापता येते.

मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये पनीर कापण्यासाठी चाकूऐवजी चक्क आरीचा वापर केला जात आहे. पनीर इतके कठीण दिसत आहे की ते कापण्यासाठीही चांगलीच मेहनत घ्यावी लागत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इंटरनेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

पनीरसारखा मऊ पदार्थ आरीने कापताना पाहून नेटकरी हैरान

व्हिडिओसोबत मजेशीर अंदाजात ‘स्वस्त आणि टिकाऊ पनीर हवे असेल तर संपर्क साधा!’ असे लिहिले जात आहे. या ओळीमुळे लोकांची उत्सुकता आणखी वाढली आहे. पनीरसारखा मऊ पदार्थ आरीने कापताना पाहून नेटकरी हैरान होऊन विविध प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण या व्हिडिओची मजा घेत आहेत, तर काहीजण पनीरच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत.

Paneer Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Vrindavan Viral Video : वृंदावनमध्ये ई-रिक्षाच्या भाड्यावरून राडा; महिलेला क्रूर मारहाण

चाकूने कापले नाही पनीर, मग आणावी लागली आरी

खरं तर बाजारात पनीरचे अनेक प्रकार उपलब्ध असतात. काही पनीर अतिशय मऊ असते, तर काहींची बनावट थोडी कठीण असते. मात्र, या व्हायरल व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने पनीर आरीने कापले जात आहे, ते पाहून पनीर इतके कठीण कसे असू शकते, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. हे सामान्य पनीर आहे की त्याची बनावट काही वेगळी आहे?

व्हिडिओमध्ये दिसणारे पनीर इतके कडक का ?

मात्र, केवळ हा व्हायरल व्हिडिओ पाहून पनीरच्या गुणवत्तेबाबत किंवा त्यात भेसळ असल्याबाबत कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. त्यासाठी योग्य तपासणी आणि ठोस माहिती आवश्यक आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे पनीर इतके कडक का आहे, याचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी संपूर्ण माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी मजेशीर कमेंट्स करत असून पनीरच्या मजबुतीवरून त्याची खिल्ली उडवत आहेत. काहींनी याला जगातील सर्वात मजबूत पनीर म्हटले आहे, तर काहींनी त्याची किंमत आणि गुणवत्ता याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.

Paneer Viral Video फोटो सौजन्य सोशल मिडिया
Traffic Police Viral Video: ‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस’ झाडाखाली बसून जेवण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल