Traffic Police Viral Video: ‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस’ झाडाखाली बसून जेवण करणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल

कर्तव्य बजावताना थोडा वेळ मिळाल्याने झाडाखाली बसून चपाती-भाजी खाणाऱ्या वाहतूक पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस असतो’ या भावनिक कॅप्शनने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले
Traffic Police Viral Video  फोटो सौजन्य AI
Traffic Police Viral Video फोटो सौजन्य AI Traffic Police Viral Video फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • कडक उन्हात, पावसातही पोलिसांचे कर्तव्य

  • कर्तव्य बजावताना अनेकदा वेळेवर जेवण करता येत नाही

  • सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव

Traffic Police Viral Video : "प्रत्येक गणवेशामागे एक माणूस असतो, जो आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत घालवायचा वेळही त्यागून देतो" अशा कॅपशन सध्या सोशल मिडियावर एका वाहतूक पोलीसाचा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडिओत एका वाहतूक पोलीस आपली नोकरी सुरू असताना मध्यला वेळेत एका झाडाखाली चपाती- भाजी खाताना दिसत आहे. त्यामुळे सोशल मियावर या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात सोशल मिडिया युझर्सचा प्रतिसाद मिळत असून हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

कडक उन्हात, पावसातही पोलिसांचे कर्तव्य

पोलीस अधिकारी आणि वाहतूक पोलीस कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवसरात्र काम करत असतात. कडक उन्हात, मुसळधार पावसात तसेच सण-उत्सवांच्या काळातही वाहतूक व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ते रस्त्यावर तैनात असतात. अनेकदा त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधीसुध्दा मिळत नाही.

Traffic Police Viral Video  फोटो सौजन्य AI
Men Doing Garba in Saree: २०० वर्षांपूर्वीच्या शापाची अनोखी परंपरा! पुरुषांनी साडी नेसून केला गरबा; अहमदाबादचा अनोखा Video Viral

कर्तव्य बजावताना अनेकदा वेळेवर जेवण करता येत नाही

‘प्रत्येक गणवेशामागे एक माणूस असतो, जो आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत घालवायचा वेळही त्यागून देतो’, अशा आशयाच्या कॅप्शनसह हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. कर्तव्य बजावताना पोलिसांना अनेकदा वेळेवर जेवण करता येत नाही. अशा परिस्थितीत रस्त्याच्या कडेला किंवा झाडाखाली बसून मिळेल त्या वेळेत जेवण उरकावे लागते. व्हायरल व्हिडिओतील दृश्यातूनही पोलिसांच्या कामातील हीच वस्तुस्थिती समोर येत आहे.

सोशल मिडियावर कौतुकाचा वर्षाव

पोलीस अधिकारी कडक उन्हात, मुसळधार पावसात आणि सण-उत्सवांच्या दिवशीही काम करताना दिसतात. आपल्याला सुरक्षेसाठी हे पोलीस अधिकारी आपल्या कुटुंबासोबतचा मौल्यवान वेळही त्यागताना दिसतात. आपण आपल्या होणाऱ्या चुकांवर प्रश्न नक्कीच उपस्थित केले पाहिजेत, परंतु प्रामाणिक सेवा आणि समर्पणाचे कौतुक करायला कधीही विसरे जाता कामा नये. तर प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेशाचा आदर केला पाहिजे. तसेस त्यामागे असलेल्या माणसाचाही आदर केला पाहिजे. प्रत्येक प्रामाणिक आणि कष्टाळू पोलीस अधिकारी मनापासून काम करत असतात त्याच्या कार्याला सलाम केलाचं पाहिजे.

Traffic Police Viral Video  फोटो सौजन्य AI
Mumbai Local Viral Video : मुंबई लोकलमध्ये 'केळवण'चा जल्लोष? वधूसाठी महिलांनी केला अनोखा सोहळा