पूरा दूल्हा समाज डरा हुआ हैं! भरमंडपात नवरीने 'असं' कृ्त्य पाहून नवदेवाला फुटला घाम; Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र, कधी धक्कादायक असे व्हिडिओ पाहायला मिळतात. स्टंट, जुगाड, डान्स, यांसारखे अनेक वेगवेगळे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. लग्न समारंभाशी संबंधित देखील अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. कधी लग्नाच्या वरातीचे, तर कधी वधू-वरांच्या विधीचे, तर कधी नातेवाईकांच्या डान्स, फोटोशूटचे, व्हिडिओचे असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात.
असे म्हटले जाते की, लग्न नवरा-नवरीच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. या क्षणाला आणखी खास बनवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम देखील आयोजित केले जातात. ल्गन केवळ दोन व्यक्तींमध्ये नव्हे तर दोन कुटुंबांना जोडणार क्षण असतो. अनेकदा ल्गन समारंभात अशा काही गोष्टी होतात की यामुळे सगळ्यांचीच धांदल उडते. तर अनेकदा काही विचित्र गोष्टींचा अनुभव देखील येतो. सध्या असाच एक विचित्र व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत वधूने असं काही केलं आहे की, हे पाहून नवऱ्यासकट सर्वांनाच घाम फुटला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर वधू-वराच्या गळ्यात माळा घालण्याची विधी सुरु आहे. या दरम्यान वधून एक विचित्र कृत्य केलं आहे. हे कृत्य पाहून वराच्या पायाखालची जमिनच सरकली आहे. तुम्ही पाहू शकता की स्टेजवरील खुर्चीवर नववधू बसलेली आहे. तिच्या आजूबाजूला कुटुंबातील सदस्य आणि नवरदेव उभा आहे. याच दरम्यान नववधू भर मंडपात विचित्र पद्धतीने हसू लागले. वधूच्या मागे असलेला एक तरुण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. पण ती कोणाचेही ऐकत नसते. ती जोरजोरात हसत असते. हे पाहून नवरदेवाला घाम फुटतो. अचानक नववधू किंचाळते आणि आपले डोकं गरागरा फिरवु लागते. केस सोडून विचित्र प्रकारे हसत उड्या मारु लागते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @mission_par_(hu) या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांना हा व्हिडिओ पाहून धक्का बसला आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने बहुतेक तिच्या अंगात भूत शिरले असेल, तर दुसऱ्या एकाने, नक्कीच देवी मा आली असणार असे म्हटले आहे. तर अनेकांनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.