मुर्खपणाचा कळस! रिलसाठी रेल्वे ट्रॅकवर जाऊन झोपला तरुण; ट्रेन आली अन्...; भयावह Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडच्या काही काळात सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी, लाईक्स मिळवण्यासाठी धोकादायक स्टंट करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. विशेष करुन यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश आहे. कोणी धावत्या गाडीच्या छतावरुन चढून स्टंट करत आहे, तर कोणी धावत्या बाईकवर उभे राहून स्टंट करत आहे. कोणी टेकडीच्या काठावर असलेल्या उंट झाडावर जाऊन रिल बनवत आहे, तर कोणी धावत्या रेल्वेसोबत सेल्फी घेण्याचा, व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्व घटनांमुळे अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तरीही तरुण पुन्हा पुन्हा तीच चुक करत आहेत.
सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एक तरुणाने रिलसाठी असे काही केलं आहे यामुळे त्याला चांगलाच भुरदंड बसला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक रेल्वे ट्रॅक दिसत आहेत. याच वेळी एक ट्रेन वाऱ्याच्या वेगाने धावत आहेत. यादरम्यान एक तरुण मोबाईल फोन घेऊन रेल्वे ट्रॅकवर जातो आणि पालथा झोपतो. यानंतर तरुणाच्या अंगावरुन रेल्वे जाते. व्हिडिओत त्यानंतर काय घडले याबद्दल काही कळालेले नाही.
उत्तर प्रदेश के उन्नाव के इस लड़के ने Reel बनाने के लिए अपनी जान जोख़िम में डाल दी।
उन्नाव के इस लड़के ने एक Reel बनाई जिसमें यह ट्रेन की पटरी पर लेट जाता है और पूरी ट्रेन इसके ऊपर से निकल जाती है,
यह लड़का इस Reel को Instagram पर पोस्ट किया है,
अब पुलिस ने संज्ञान लेते हुए… pic.twitter.com/HXwa2jgDqX
— Jaiky Yadav (@JaikyYadav16) April 7, 2025
दरम्यान ही घटना उत्तर प्रदेशात घडली असून जॅकी यादव याने याची एक्सवर व्हिडिओ शेअर करत माहिती दिली. व्हिडिओत दिलेल्या माहितीनुसार, सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले आहेत. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे त्याला रेल्वे विभागाच्या पोलिंसानी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली. तरुणाविरोधात रेल्वे मार्गात अडथळा निर्माण करण्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला भुरदंडही भरावा लागला आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Reel बनाना शौक था, जेल जाना हकीकत बन गया। लाइक्स के लिए जान जोखिम में डालना पड़ा महंगा, अब सोशल मीडिया नहीं, हवालात में वायरल हो रहा है! pic.twitter.com/vDVv9oADyD
— Dr. Jyotsana (jyoti) (@DrJyotsana51400) April 7, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ @DrJyotsana51400 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला अनेकांनी लाईक केले आहे. तसेच अनेकांनी संतापजनक अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी याला मुर्खपणा म्हटले आहे. मात्र एका व्यक्तीने त्याचा व्हिडिओ लाईक करणाऱ्या आणि त्याला व्ह्यूज मिळवून देणाऱ्यांवर टीका केली आहे. त्याने म्हटले आहे की, अशा व्हिडिओला लाईक्स आणि व्ह्यूज मिळाल्यामुळे लोक असे व्हिडिओ बनवत असतात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.