(फोटो सौजन्य – X)
गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचे अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्याने सर्वांनाचा अचंबित केले आहे. वास्तविक, आजकाल अफेअर्सचे प्रमाण फार वाढले आहे. प्रेमीयुगुल आपल्या आई-वडिलांच्या नकळत एकमेकांना भेटतात आणि वेळ घालवतात आणि चोरून चोरून फोनवरही संवाद सादतात. मात्र आपले हे खोटे फार काळ टिकत नाही हेच खरे. कितीही खोटं बोललं तरी कधी ना कधी ते पकडलं जातंच… हाच विचार पटवून देणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये तुम्हाला धक्का देतील. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
कानपूरमधील एका जोडप्यासोबत एका धक्कादायक प्रकार घडून आला ज्यामुळे संपूर्ण रस्त्यात त्यांना लाजेला सामोरे जावे लागले. एवढेच नाही तर या संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला. खरंतर, एक मुलगा त्याच्या गर्लफ्रेंडसोबत बाजारात चाउमीन खात होता. दरम्यान, मुलाचे पालक तेथून जात आहेत आणि त्यांना तो त्याच्या मैत्रिणीसोबत दिसतो. त्यानंतर तो रस्त्याच्या मधोमध सर्वांसमोर दोघांनाही बेदम मारहाण करू लागतो.
कानपूरच्या गुजैनी भागातील राम गोपाल चौकात ही घटना घडली. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा २१ वर्षांचा आहे. तर त्याची प्रेयसी १९ वर्षांची आहे. कुटुंबातील सदस्यांना पाहून दोन्ही जोडपे स्कूटरवर बसून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. पण मग मुलाचे पालक त्यांना थांबवतात. त्यानंतर मुलाची आई त्याला जोरात मारायला सुरुवात करते. यावेळी त्याची आई मागे बसलेल्या गर्लफ्रेंडचेही जोरजोरात केस ओढायलाही सुरुवात करते. तर मुलाचे वडील त्याला चपलेने मारताना दिसून येतात. काही वेळातच रस्त्यावर लोकांची गर्दी जमते आणि लोक हा हाय व्होटेज ड्रामा मजा घेत पाहू लागतात. यावेळी काही लोक ते थांबवण्याचाही प्रयत्न करतात. या भांडणात पुढे काय घडलं ते मात्र व्हिडिओत दाखवण्यात आले नाही मात्र हा व्हिडिओ इंटरनेटवर जोरदार व्हायरल होत आहे. लोक हा व्हिडिओ शेअर करून करून पाहत आहेत.
#कानपुर मां ने बेटे और बेटे की प्रेमिका को साथ पकड़ा बीच सड़क कर दी पिटाई..
लड़के की मां ने बेटे की प्रेमिका को बीच सड़क जमकर पीटा,बीचब चाव कर थे बेटे की भी हुई पिटाई, गुजैनी थाना क्षेत्र के राम गोपाल चौराहे की घटना ।#kanpur #news #sirfsuch pic.twitter.com/Rh9vopObhz
— ठाkur Ankit Singh (@liveankitknp) May 2, 2025
खोडसाळपणा तर पाहा! नागिणीला पाहताच बिहारच्या मुलांनी फोनवर वाजवली बिन, मग पुढे जे घडलं… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @liveankitknp नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “खरे पालक आणि चांगले पालकत्व” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजच्या काळात, मुलांना अशी मारहाण केल्याने पालकांशी असलेले नाते तुटते, ही चर्चा घरात झाली असती तर बरे झाले असते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.