(फोटो सौजन्य – X)
सोशल मीडियावर सध्या एक हास्यास्पद व्हिडिओ मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. यातील दृश्ये इतकी अनोखी आहेत की ती पाहून युजर्सना आश्चर्याचा धक्का बसला. कधीही न पाहिलेलं हे दृश्य जेव्हा व्हिडिओत दिसून आले तेव्हा सोशल मीडियावर हास्याचा पूर आला, कारण यात एक बैल चालू रस्त्यावर चक्क स्कुटर चालवताना दिसून आला. होय, खोटी वाटणारी ही घटना सत्यात घडली असून लोक आता याचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत. तर युजर्स हा व्हिडिओ वेगाने शेअर देखील करत आहेत. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील असल्याचे सांगितले जात आहे. ऋषिकेशच्या रस्त्यांवर ही विचित्र घटना कुठे घडली. या व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, एक भटका बैल रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कूटरजवळ येतो आणि चुकून त्या पार्क केलेल्या स्कूटरवर चढतो, ज्यामुळे बैलाचे शरीर त्या स्कुटरमध्ये अडकते आणि यानंतर स्कुटरला ओढत तो पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. यानंतर ज्याने हा व्हिडिओ पाहिला त्याला हे दृश्य पाहून असे वाटले की जणू बैल स्वतःच स्कूटर चालवत आहे. तो बैल त्या स्कूटरला ओढत काही अंतर घेऊन जातो. शेवटीयू स्कूटरचा तोल बिघडतो आणि स्कूटर अडखळून खाली पडते. मग बैलही तिथून पळून निघून जातो.
इंसानों को स्कूटी चोरी करते हुए बहुत बार देखा होगा लेकिन ऋषिकेश में स्कूटी चोरी का मामला कुछ अलग है। यहां गली में घूमने वाले आवारा सांड भी बाइक स्कूटी का शौक रखते है। pic.twitter.com/37TRoCzhcb
— bhUpi Panwar (@askbhupi) May 2, 2025
सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडिओ @askbhupi नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “असे पहिल्यांदाच पाहिले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “तो चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे वाटत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.