Batumi Airport Clash : बटुमी विमानतळावर तुर्की आणि इस्रायली फुटबॉल चाहत्यांमध्ये राडा; झेंडे फडकावणे आणि घोषणाबाजीने तणाव, पहा VIDEO

Batumi Airport Clash: जॉर्जियामधील बटुमी विमानतळावर तुर्की आणि इस्रायली फुटबॉल चाहत्यांमध्ये संघर्ष झाला. ध्वज फडकावण्याने आणि घोषणाबाजीने तणाव वाढला. दोन देशांच्या चाहत्यांमधील या वादाला नेमके काय कारण ठरले?
Turkish Israeli football fans clash Batumi airport
Batumi Airport Clash : बटुमी विमानतळावर तुर्की आणि इस्रायली फुटबॉल चाहत्यांमध्ये राडा; झेंडे फडकावणे आणि घोषणाबाजीने तणाव, पहा VIDEO ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Published on: 
Updated on: 
  1. विमानतळावर तणाव आणि धक्काबुक्की

  2. झेंडे आणि घोषणाबाजीवरून वाद

  3. सामन्यात बेसिक्तासचा विजय

आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांनंतर (Football) अनेकदा खेळाडूंपेक्षा चाहत्यांमधील संघर्षामुळेच अधिक चर्चा रंगते. जॉर्जियातील बटुमी विमानतळावर शनिवारी अशीच एक तणावपूर्ण घटना समोर आली, जिथे तुर्की आणि इस्रायली फुटबॉल क्लबच्या समर्थकांमध्ये जोरदार वाद आणि धक्काबुक्की झाली. खराब हवामानामुळे विमानांचे वेळापत्रक कोलमडले आणि दोन्ही संघांचे चाहते विमानतळावर समोरासमोर आले. त्यानंतर क्षणातच वातावरणातील तणाव वाढला आणि भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान जसा तणाव जाणवतो, तशीच स्थिती विमानतळावर निर्माण झाली.

हा वाद केवळ विमानतळापुरता मर्यादित नव्हता, तर त्याची पाळेमुळे गुरुवारी झालेल्या फुटबॉल सामन्यापर्यंत जोडलेली आहेत. तुर्कीमध्ये इस्रायली संघांविरुद्ध असलेल्या राजकीय आणि सुरक्षाविषयक संवेदनशीलतेमुळे हा सामना तटस्थ ठिकाण म्हणून जॉर्जियातील बटुमी येथे खेळवण्यात आला होता. मात्र, मैदानावर सुरू झालेली राजकीय आणि भावनिक धग विमानतळावरही कायम राहिल्याचे पाहायला मिळाले.

विमानतळावर नेमके काय घडले? झेंडे आणि घोषणाबाजीवरून वाद

मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळावर प्रतीक्षा करत असताना तुर्की क्लब बेसिक्तासच्या काही समर्थकांनी झेंडे फडकावून इस्रायली चाहत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या कृतीला प्रत्युत्तर म्हणून हापोएल बीर-शेवा क्लबच्या समर्थकांनी इस्रायलचा राष्ट्रध्वज फडकावला. यावरून दोन्ही गटांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली आणि पाहता पाहता त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले.

काही बेसिक्तास समर्थकांनी इस्रायलविरोधी घोषणा दिल्याचेही वृत्त समोर आले आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच विमानतळावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि दोन्ही गटांना वेगळे केले. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायली क्लबचे खेळाडू आणि कर्मचारी यांना सुरक्षेच्या कारणास्तव आधीच एका वेगळ्या खोलीत सुरक्षित ठेवण्यात आले होते, त्यामुळे त्यांचा या विमानतळावरील गोंधळाशी कोणताही थेट संबंध नव्हता.

Turkish Israeli football fans clash Batumi airport
California Earthquake : कॅलिफोर्निया शक्तिशाली भूकंपाने हादरले! विमानतळावर उडाला गोंधळ, उतरणारी विमाने वळवली; 2014 नंतरचा सर्वात मोठा धक्का

गुरुवारच्या सामन्यातही दिसली होती तणावाची झलक

बटुमी विमानतळावरील हा तणाव अचानक निर्माण झालेला नव्हता. गुरुवारी बटुमी येथे पार पडलेल्या या दोन क्लबांमधील सामन्यादरम्यानच तणावाची तीव्र झलक दिसून आली होती. त्या सामन्यात स्टेडियममध्ये सुमारे २०,००० बेसिक्तास समर्थक उपस्थित होते, तर सुमारे ४०० हापोएल बीर-शेवा चाहत्यांना कडक सुरक्षा बंदोबस्तात ठेवण्यात आले होते.

सामन्यापूर्वीच तुर्की समर्थकांनी पॅलेस्टिनी झेंडे फडकावत इस्रायलविरोधी घोषणाबाजी केली होती. मैदानातील वातावरण इतके तापलेले होते की, सामन्यापूर्वी दोन्ही संघांतील खेळाडूंनी नेहमीप्रमाणे हस्तांदोलन करणेही टाळले. खेळ सुरू होण्यापूर्वीच दोन्ही बाजूंच्या भावना पराकोटीला पोहोचल्या होत्या.

Turkish Israeli football fans clash Batumi airport
Pakistan Blasphemy Law : पाकिस्तानमधील ख्रिस्ती समाजावर नवे संकट! ईशनिंदा कायद्यातील शिक्षा वाढवण्याचा ठराव मंजूर; नेमकं प्रकरण काय?

मैदानाबाहेर खेळाडू आणि प्रशिक्षकांमध्ये बाचाबाची; २-१ ने सामना कोणाचा?

सामन्याच्या सुमारे २१ व्या मिनिटाला मैदानावर एक वेगळाच प्रसंग घडला. बेसिक्तासचा मिडफिल्डर सालिह ओझकान आणि हापोएल बीर-शेवाचे प्रशिक्षक रान कोझुच यांच्यात मैदानाबाहेर टक्कर झाली. या घटनेनंतर दोन्ही संघांचे खेळाडू आणि प्रशिक्षण कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली.

वादाचे स्वरूप वाढू नये आणि वातावरण शांत राहावे, यासाठी सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. पंच आणि अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर खेळ पुन्हा सुरू झाला. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत अखेरीस बेसिक्तासने २-१ अशा फरकाने विजय मिळवला. मात्र, खेळाच्या पलीकडे जाऊन राजकीय आणि भावनिक तणावामुळे ही लढत आणि त्यानंतरचा विमानतळावरील प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.

Q

बटुमी विमानतळावर तुर्की आणि इस्रायली चाहत्यांमध्ये वाद का झाला?

A

खराब हवामानामुळे विमानांना विलंब झाल्याने दोन्ही क्लबचे चाहते विमानतळावर आले आणि झेंडे फडकावणे व घोषणाबाजीवरून त्यांच्यात वाद व धक्काबुक्की झाली.

Q

हा सामना तुर्कीऐवजी जॉर्जियातील बटुमी येथे का खेळवण्यात आला?

A

तुर्कीमध्ये इस्रायली संघांविरुद्ध असलेल्या राजकीय आणि सुरक्षाविषयक तणावामुळे हा सामना बटुमी येथे आयोजित करण्यात आला होता.

Q

बटुमी येथे झालेल्या फुटबॉल सामन्यात कोणाचा विजय झाला?

A

या सामन्यात बेसिक्तास संघाने २-१ असा विजय मिळवला.