अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी चार देशांमधील निवडणुकांमध्ये थेट हस्तक्षेप केला: त्यापैकी तीन जिंकले; नेतन्याहू यांचे काय होईल? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
जागतिक राजकारणात (World Politics) अमेरिकेच्या धोरणांचा प्रभाव नेहमीच राहिला आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या प्रभावाला एका नव्या वळणावर आणून ठेवले आहे. ट्रम्प यांनी आता थेट इतर देशांमधील अंतर्गत निवडणुकांमध्ये उघडपणे हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या आवडत्या नेत्यांना आणि पुराणमतवादी विचारसरणीच्या पक्षांना विजयी करण्यासाठी ट्रम्प सोशल मीडिया, राजकीय वक्तव्ये आणि आर्थिक धमक्यांचा सर्रास वापर करत आहेत. नुकतेच त्यांनी इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या बाजूने उघडपणे उतरत २७ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या इस्त्रायली संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना नेतान्याहूंच्या मागे उभे राहण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी ट्रम्प यांनी जगभरातील चार महत्त्वाच्या देशांच्या निवडणुकांमध्ये असाच हस्तक्षेप केला होता, ज्यातील तीन ठिकाणी त्यांच्या समर्थित उमेदवारांनी विजय मिळवला, तर एका ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
ट्रम्प यांच्या या धोरणामुळे जागतिक राजकारणात आणि कूटनीतीत मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्या देशांच्या लोकशाही प्रक्रियेत आणि जनमतावर प्रभाव पाडण्याचा राष्ट्राध्यक्षांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरतोय, हे समजून घेण्यासाठी त्यांनी आधी हस्तक्षेप केलेल्या देशांमधील निकालांचा आढावा घेणे अत्यंत गरजेचे ठरते.
नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या होंडुरासच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी पहिल्यांदा आपले राजकीय वजन वापरले. त्यांनी तेथील पुराणमतवादी उमेदवार नसरी अस्फुरा यांना थेट पाठिंबा दिला. इतकेच नाही तर अस्फुरा यांचा पराभव झाल्यास अमेरिका होंडुरासला मिळणारी सर्व आर्थिक मदत रोखले असा उघड इशारा ट्रम्प यांनी दिला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार साल्वाडोर नसरल्ला यांच्यावरही कडाडून टीका केली. २४ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात ट्रम्प यांच्या पसंतीच्या अस्फुरा यांनी ४०.२७% मते मिळवून निसटता विजय मिळवला, तर नसरल्ला यांना ३९.५३% मते मिळाली. येथे ट्रम्प यांचा उमेदवार जिंकला असला तरी हा विजय अत्यंत अल्प फरकाने मिळाला होता.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL: कॅमेऱ्यासमोर घडला थरार! ‘एक दिवस सर्वांना जायचे आहे’ असे धर्मगुरूनी सांगताच क्रूस अंगावर पडला आणि…
फेब्रुवारी २०२६ मध्ये जपानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान सनाए ताकाइची आणि त्यांच्या सत्ताधारी आघाडीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला. ताकाइची यांना एक खंबीर आणि लोकप्रिय नेत्या म्हणून संबोधित करत ट्रम्प यांनी ही निवडणूक जपानच्या सुरक्षेसाठी आणि भविष्यासाठी अत्यंत निर्णायक असल्याचे म्हटले. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत ताकाइची यांच्या आघाडीने ऐतिहासिक आणि प्रचंड बहुमताने विजय मिळवला. येथे ट्रम्प यांचा पाठिंबा ताकाइची यांच्या राजकीय प्रतिमेला अधिक मजबूत करणारा ठरला.
תודה לנשיא טראמפ על התמיכה האדירה בי בבחירות. יחד עשינו דברים גדולים ויחד – בשנתיים הקרובות – נשלים את המשימה ונחסל את הגרעין האיראני. זה או ימין – או פלסטין.
או ימין – או גרעין. צאו להצביע מחל! https://t.co/LAE6DoiBWk — Benjamin Netanyahu – בנימין נתניהו (@netanyahu) October 18, 2026
credit – social media and Twitter
अनेक देशांमध्ये यश मिळाल्यानंतर एप्रिल २०२६ मध्ये हंगेरीच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या रणनीतीला मोठा धक्का बसला. ट्रम्प यांनी हंगेरीचे उजव्या विचारसरणीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बान यांना पाठिंबा दिला होता. ट्रम्प यांचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी तर थेट बुडापेस्टला भेट देऊन ऑर्बान यांच्या बाजूने जाहीर भाषणे केली. मात्र, हंगेरीतील मतदारांनी स्थानिक प्रश्न, आर्थिक मंदी, भ्रष्टाचार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे झालेले एकाकीपण या मुद्द्यांवर मतदान केले. पीटर मॅग्यार यांच्या नेतृत्वाखालील टिस्झा पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत ऑर्बान यांच्या सत्तेला सुरुंग लावला. या निकालाने हे सिद्ध केले की परदेशी नेत्याचे समर्थन स्थानिक असंतोषापुढे अपुरे पडू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : COP17 Summit: 2030 चे ध्येय निसटले हातातून! अर्मेनियात 200 देशांचे प्रतिनिधी चिंताक्रांत; वाचा येरेवान परिषदेचे थेट वृत्त
जून २०२६ मध्ये झालेल्या कोलंबियाच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांनी अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांना पाठिंबा दर्शवला. कोलंबिया-अमेरिका संबंधांच्या भविष्यासाठी हा निकाल महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. प्राथमिक मतमोजणीत दे ला एस्प्रीएला यांनी ४९.६६% मते मिळवून विजय संपादन केला. या हस्तक्षेपावर कोलंबियाचे मावळते अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली. एका देशाने दुसऱ्या देशाच्या निवडणुकीत असा हस्तक्षेप करणे म्हणजे लोकशाही आणि स्वातंत्र्यावर थेट गदा आणण्यासारखे आहे, असा आरोप पेट्रो यांनी केला.
Ans: ट्रम्प यांनी होंडुरास, जपान, हंगेरी आणि कोलंबिया या चार देशांच्या अध्यक्षीय आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये उघड पाठिंबा दिला होता.
Ans: ट्रम्प यांनी नेतान्याहूंना धाडसी नेता म्हणत पाठिंबा दिला आणि इस्त्रायलने दुसरा नेता निवडल्यास अमेरिकेला स्वतः कारवाई करावी लागेल असा इशारा दिला.
Ans: इस्त्रायलच्या संसदेत (Knesset) एकूण १२२० जागा असून सरकार स्थापन करण्यासाठी ६१ खासदारांच्या बहुमताची गरज असते.






