फोटो सौजन्य AI
Nepal Flood : अचानक आलेल्या पुराचा कहर; मृतांचा आकडा ५३८ वर
अमेरिकेच्या आर्थिक दबावाच्या नव्या मोहिमेवर इराणने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे . तेहरानने यापूर्वीही अमेरिकेच्या निर्बंधांना विरोध केला असून , नव्या मोहिमेमुळे इराणच्या तेल निर्यातीपासून आर्थिक व्यवहारापर्यंत विविध क्षेत्रांवर परिणाम होण्याची शक्यता आहे .
अमेरिकेने इराणशी आर्थिक संबंध ठेवणाऱ्या इतर देशांवर आणि कंपन्यांवरही कारवाई करण्याचा इशारा दिला आहे . त्यामुळे इराणच्या जागतिक व्यापार आणि आर्थिक नेटवर्क आणखी अडचणीत आणण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असलयाचे स्पष्ट होत आहे .
इराणने अमेरिकेच्या या धोरणावर जोरदार टीका करताना , एका देशाची इच्छा स्वतंत्र राष्ट्रांवर लादण्याचा प्रयत्नाला इतर देशांनी साथ देऊ नये असा इशारा दिला आहे . तेहरानने अमेरिकेच्या आर्थिक दबाव मोहिमेला विरोध करण्याचे आवाहन करत देशांच्या सार्वभौमत्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे .
इराणच्या अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या निर्बंधामुळे देशाला झुकवता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे . दरम्यान इराणने अमेरिकेच्या मोहिमेत सहभागी होणाऱ्या देशांबाबत कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
अमेरिकेची नवीन आर्थिक मोहीम केवळ इराणपुरती मर्यादित नसून इराणसोबत व्यापार करणाऱ्या देशांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे . विशेषतः तेल व्यापार आणि आर्थिक व्यवहारांमध्ये इराणशी संबंध असलेल्या देशांसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते . चीन तुर्की इराक आणि पाकिस्तानसारखे देश इरांसोबतचे संबंध आणि अमेरिकेचा दबाव यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यामुळे पुढील काळात इराण – अमेरिका संघर्षाचा परिणाम केवळ मध्यपूर्वेपुरता न राहता जागतिक व्यापार आणि बाजारावरही जाणवू शकतो .






