mahinda rajpakshe
कोलंबो : श्रीलंकेचे (Sri Lanka) पंतप्रधान महिंदा राजपक्षे (Sri Lanka PM Mahinda Rajapaksa) राजीनामा देण्याची शक्यता आहे. आपले भाऊ आणि देशाचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी केलेल्या आवाहनानंतर महिंदा राजपक्षे यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा (Resignation) देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपती गोटबाया यांनी राजपक्षे यांना आर्थिक संकटामुळे (Economic Crisis) पदाचा राजीनामा देण्याची केलेली सूचना राजपक्षे यांनी मान्य केली आहे.
श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आर्थिक संकट ओढवलं आहे. परदेशी कर्ज चुकवण्यासह परदेशातून महत्त्वाच्या वस्तू आयात करण्यासाठीचे पैसेही श्रीलंकेकडे उरले नाहीत. त्यामुळे देशातील नागरिकांचा अनेक तास वीज पुरवठाही खंडित केला आहे. एवढेच नव्हे तर श्रीलंकेतील नागरिकांना अन्न, औषध आणि इंधन सुद्धा नीट मिळत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत पुन्हा एकदा आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
[read_also content=”ओबीसींच्या राजकीय आरक्षणाची महाविकास आघाडी सरकारकडून कत्तल – देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल https://www.navarashtra.com/maharashtra/devendra-fadnavis-statement-about-mahavikas-aghadi-governments-role-on-obc-reservaton-nrsr-277110.html”]
राष्ट्रपती भवनात कॅबिनेटची विशेष बैठक पार पडली. त्यात महिंदा राजपक्षे यांनी पदाचा राजीनामा देण्यास संमती दर्शवली असल्याचं सांगितलं जात आहे. देशात आर्थिक संकट ओढवल्याने तुम्ही पदाचा राजीनामा द्यावा, अशी सूचना कॅबिनेटने राजपक्षे यांना केली आहे, असं वृत्त आहे. राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर कॅबिनेटही बरखास्त होईल. माझ्या राजीनाम्यामुळे श्रीलंका आर्थिक संकटातून बाहेर येणार असेल तर मी तेही करायला तयार आहे, असं राजपक्षे यांनी म्हटलं होतं.