फोटो सौजन्य AI
याचे स्पष्टीकरण देण्याची मागणी ऑस्ट्रेलियन सरकारकडे केली जात आहे . मानवी हक्क संघटनांनी संबंधित व्यक्तींच्या लष्करी पार्श्वभूमीची आणि संभाव्य आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी भूमिकेची तपासणी करण्याची मागणी केली आहे .
सिडनी मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी इस्रायली लष्करातील वर्तमान आणि माजी सदस्यांसह सुमारे ४० जण औट्रेलियात दाखल झाल्याचा दावा करण्यात आला आहे . या प्रतिनिधी मंडळात गाझा , वेस्ट बँक किंवा लेबनॉन मध्ये सेवा बजावलेल्या व्यक्तींचा समावेश असल्याचे ऑस्ट्रेलियन center for International Justice ने म्हंटले आहे .
या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींना ऑस्ट्रेलियात प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्या लष्करी सेवेशी संबंधित प्राश्वभूमीची कितपत तपासणी करण्यात आली . असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे .
मानवी हक्क संघटनांनी ऑस्ट्रेलियन सरकारला इस्रायली लष्कर किंवा सुरक्षा यंत्रणेत सेवा केलेल्या व्यक्तींची अधिक कठोर तपासणी करण्याचे आवाहन केले आहे . संभाव्य युद्धगुन्हे , मानवतेविरुद्धचे गुन्हे किंवा इतर गंभीर आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांशी संबंधित विश्वसनीय माहिती आढळ्यास त्याची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे .
ऑस्ट्रेलियाच्या स्थलांतर कायद्यात गंभीर गुन्ह्यांशी संबंधित व्यक्तींचा व्हिसा आणि प्रवेशाचा विचार करण्याची तरतूद आहे . त्यामुळे सरकारने या प्रकरणात कोणती प्रक्रिया आणि निकष वापरले हे स्पष्ट करण्याची मागणी होत आहे .
Nepal Flood : नेपाळ-तिबेटमध्ये महापुराचा हाहाकार; मृतांचा आकडा 750 वर, 3 हजारांहून अधिक बेपत्ता
दरम्यान , ३० ऑगस्ट रोजी झालेल्या सिडनी मॅरेथॉनमध्ये ४० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग घेतला . या वर्षीची स्पर्धा Abbott World Marathon Majors मालिकेचा भाग असल्याने जगभरातून मोठ्या संख्येने धावपट्टू सिडनीमध्ये दाखल झाले .
इस्रायली प्रतिनिधी मंडळाच्या सहभागामुळे मात्र क्रीडा स्पर्धेपेक्षा राजकीय आणि मानवी हक्कांचा मुद्दा चर्चेत आला आहे . या पार्श्वभूमीवर काही संघटनांनी सिडनीमध्ये निदर्शने केली . महत्वाचे म्हणजे प्रतिनिधी मंडळातील प्रत्येक व्यक्तीवर युद्धगुन्ह्याचा आरोप आहे . असा निष्कर्ष काढता येत नाही . सध्या मुख्य प्रश्न संबंधित व्यक्तींच्या प्रवेशावेळी ऑस्ट्रेलियन प्रशासनाने केलेल्या सुरक्षा आणि पार्श्वभूमी तपासणीचा आहे .






