अमेरिकी नौदलाची मोठी कारवाई… इराणचे ३ तेलवाहू जहाजं जळून खाक, विमानवाहू जहाजावरील हल्ल्याचा बदला घेतला ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
पश्चिम आशिया आणि मध्य पूर्वेतील सागरी प्रदेशात अमेरिका आणि इराण (US Iran War) यांच्यातील लष्करी संघर्ष आता अत्यंत भीषण व धोकादायक टप्प्यावर पोहोचला आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गावर गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या नौदलावर इराणने क्षेपणास्त्र हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर, अमेरिकन सैन्याने जोरदार पलटवार केला आहे. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अमेरिकन हवाई दल आणि नौदलाने एका विशेष मोहिमेत इराणच्या ‘शॅडो नेटवर्क’चा भाग असलेली तीन महाकाय कच्च्या तेलाची जहाजे (Oil Tankers) यशस्वीरीत्या क्षेपणास्त्रे डागून कायमची निकामी व नष्ट केली आहेत.
हा सागरी संघर्ष तेव्हा पेटला जेव्हा इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत तैनात असलेल्या अमेरिकेच्या एका महाकाय विमानवाहू जहाजाला (Aircraft Carrier) आणि गाईडेड-मिसाइल डिस्ट्रॉयर युद्धनौकेला लक्ष्य करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. मात्र, अमेरिकेच्या अत्याधुनिक नौदल संरक्षण यंत्रणेने ही सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली. या हल्ल्यात अमेरिकेचे कोणतेही सैनिक जखमी झाले नाहीत किंवा युद्धनौकांचे नुकसान झाले नाही. परंतु, आपल्या सैन्यावर झालेला हा हल्ला अमेरिकेने अत्यंत गंभीरपणे घेतला आणि काही तासांतच प्रत्युत्तराची मोठी कारवाई केली.
सेंटकॉमने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकन लष्कराने इराणच्या तेल वाहतूक नेटवर्कला लक्ष्य करत तीन वेगवेगळ्या ठिकाणी ही धडक कारवाई केली:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia-Ukraine War: कीव, मॉस्कोचे हल्ले थांबले! पुतिन यांनी घेतली ट्रम्पच्या दूतांची भेट; वॉशिंग्टनला दिला ‘हा’ महत्त्वाचा संदेश
अमेरिकन लष्करी अधिकाऱ्यांच्या मते, हे तीनही टँकर इराणच्या अब्जावधी डॉलर्स किमतीच्या गुप्त “शॅडो नेटवर्क”चा (Shadow Network) भाग होते. इराण आंतरराष्ट्रीय निर्बंधांना बगल देऊन बेकायदेशीरपणे कच्च्या तेलाची विक्री करण्यासाठी या नेटवर्कचा वापर करत होता. या तेल व्यापारातून मिळणाऱ्या अब्जावधी रुपयांचा निधी इराण आपल्या लष्करी कारवायांना आणि मध्य पूर्वेतील आपल्या हस्तक (Proxy) दहशतवादी संघटनांना देण्यासाठी वापरत होता. अमेरिकेने हे आर्थिक स्रोत तोडण्यासाठीच ही थेट कारवाई केली आहे.
सेंटकॉमचे कमांडर ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी या कारवाईनंतर इराणला थेट अन् कडक शब्दांत इशारा दिला आहे. ते म्हणाले, “इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवावी; जर तुम्ही आमच्या दोन जहाजांवर हल्ल्याचा प्रयत्न कराल, तर आम्ही तुम्हाला अधिक मोठा आर्थिक फटका देवू आणि तुमची तीन जहाजे उडवून देऊ. अमेरिकन सैनिकांच्या सुरक्षेसाठी आम्ही मागेपुढे पाहाणार नाही आणि गरज पडल्यास इराणचा उर्वरित तेल ताफाही समुद्रात गाडून टाकू.”
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Africa Continent: 500 वर्षांनंतर जगाचा नवा नकाशा! आफ्रिका खंड युरोप अन् अमेरिकेपेक्षा मोठा; 164 देशांचा UN मध्ये पाठिंबा
होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) ही जगातील सर्वात महत्त्वाची तेल वाहतूक मार्गिका मानली जाते. जगातील एकूण कच्च्या तेलाच्या व्यापारापैकी पाचवा भाग याच मार्गावरून होतो. लारक बेटावरील लष्करी कारवाया आणि आता तीन महाकाय टँकर्सवर झालेल्या या प्रत्युत्तराच्या हल्ल्यांमुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिका आणि इराणमधील या थेट लष्करी संघर्षाने आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाचे दर गगनाला भिडण्याची आणि जागतिक ऊर्जा पुरवठ्याची साखळी विस्कळीत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.






