voting
मेरठ : बहुचर्चित उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी (UP Assembly Election 2022) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडते आहे. यात मेरठ (Meerut) आणि आगरा भागातील प्रमुख जागा आहेत. नोएडा (Noida), गाझियाबाद (Gaziabad), हापुड, मेरठ (Meerut), मुज्जफरनगर, शामली, बागपत, अलीगढ, मथुरा, आगरा, बुलंदशहर या भागात मतदान सुरु आहे. मात्र गेल्या दोन निवडणुकीतील (Election Results) इथले निकाल आश्चर्यकारक आहेत.
२०१७ साली काय झाले
२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेमुळे ५८ पैकी ५३ जागा भाजपाला मिळाल्या होत्या. या परिसरात २०१२ साली भाजपाला केवळ १० जागा मिळाल्या होत्या. भाजपाला २०१७ साली ४३ जागांचा फायदा झाला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुकांनंतर पश्चिम यूपीत भाजपा हा मोठा पक्ष म्हणून गणला जाऊ लागला. मुज्जफरनगर दंगल, कैराना पलायन प्रकरणात भाजपाने महत्त्वाची भूमिका घेतली.
२०१७ साली सपा, बसपा आणि रालोदचे हक्काचे मतदारसंघ भाजपाच्या ताब्यात आले. सपाला कैराना आणि मेरठमधील दोनच जागा मिळाल्या. बसपाला या ५८ पैकी केवळ २ जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर रालोदला एक जागा मिळाली होती.
२०१२ साली काय झाले
२०१२ च्या निवडणुकीत या ५८ पैकी २० जागा घेत मायावती नंबर एकला होत्या. अखिलेश यादव यांनी त्यावेळी सरकार स्थापन केले होते, मात्र सपाला या जागांतून केवळ १४ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपाच्या पदरात १० पडल्या होत्या. तर रालोदला ९ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला या ५८ पैकी ४ तर एका जागी अपक्ष निवडून आला होता.या निवडणुकीत या भागातील कैराना, मुझफ्फरनगर, मथुरा, आग्रा ग्रामीण, सरधना आणि हस्तिनापूर या जागा महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.