utpal parrikar
पणजी: माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utapal Parrikar) यांनी भाजपाशी बंडखोरी केली आहे. पणजीतून (Panji) भाजपाने तिकिट न मिळाल्याने नाराज झालेल्या उत्पल यांनी भाजपाला रामराम केला आहे. पणजीच्या जागेवरुन मनोहर पर्रीकर हे निवडणूक लढवीत असत. मात्र भाजपाने गुरुवारी जाहीर केलेल्या ३४ उमेदवारांच्या यादीत उत्पल यांचे नाव नव्हते. पर्रीकरांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी बाबूश मेन्सोरात यांना या मतदारसंघातून भाजपाने तिकिट दिले आहे. त्यामुळे उत्पल पर्रीकर नाराज झाले होते. आता त्यांनी अपक्ष लढणार असल्याचे जाहीर (Utapal Parrikar To Fight Individualy Without Any paryt Support) केले आहे.
गुरुवारी भाजपाची ३४ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर, पर्रीकर यांच्यापुढे दोन मतदारसंघांचे पर्याय दिल्याचीही चर्चा होती, हे दोन्ही मतदारसंघ उत्पल यांनी फेटाळले होते. आज अखेरीस त्यांनी आपली भूमिका जाहीर करत, अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पणजी मतदारसंघातील मतदारांचा आपल्याला पाठींबा असून, तेच आपल्या भाग्याचा फैसला करतील, असेही उत्पल यांनी सांगितले आहे. कार्यकर्ते आणि नागरिकांचा आपल्याला पाठिंबा आहे, हे भाजपा नेत्यांना समजावले. मात्र तरीही भाजपाने आपल्यावर अन्याय केला, अशी भावना उत्पल पर्रीकर यांची आहे.
केजरीवाल यांनीही दिली होती ऑफर
भाजपाची यादी जाहीर झाल्यानंतर आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनीही उत्पल यांना आपमध्ये येऊन पणजीतून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. भाजपाच्या वापरा आणि फेकून द्या, या भूमिकेमुळे गोवेकर नाराज असल्याचेही केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
उत्पल यांचा निर्णय भाजपाला धक्का
मनोहर पर्रीकर यांचे गोव्यात मोठे नाव होते. त्यांनी भाजपासाठी आपले आयुष्य वेचले. अशा स्थितीत त्यांच्या मुलानी घेतलेला निर्णय हा भाजपासाठी मोठा धक्का मानण्यात येतो आहे. निवडणुकांआधी त्यांच्या या निर्णयाने भाजपाला राज्यात फटका बसण्याची चिन्हे आहेत. उत्पल हे बंडखोरी करणार नाहीत, अशी भाजपाला आशा होती.
उत्पल यांना गोव्यातील भविष्य असे भाजपाकडून पाहिले जात होते. यावेळी जरी ते निवडणूक हरले असते तरी त्यांना पक्षात चांगली जबाबदारी देण्यात येणार होती, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली आहे. चार वर्षांनंतर २०२७ साली उत्पल यांचे मोठे लॉन्चिंग करण्याची भाजपाची योजना होती. मात्र आता उत्पल यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोव्यातील निवडणूक भाजपासाठी अधिक अडचणीची झाली असेच म्हणावे लागेल.
[read_also content=”ट्रेनमध्ये जोरजोरात बोलणाऱ्यांवर आणि मोठ्याने गाणी ऐकणाऱ्यांवर उगारला जाणार कारवाईचा बडगा, रेल्वेच्या नव्या नियमावलीतील नियम वाचा एका क्लिकवर https://www.navarashtra.com/india/indian-railway-new-guidelins-for-train-passengers-nrsr-225886.html”]
मनोहर पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट मागायचे असते तर मागच्यावेळीच मागितलं असतं. मात्र मागच्यावेळी पार्टीने जे सांगितलं तेच मी केलं. वडील सक्रिय असताना मी कधीच पुढे पुढे केलं नाही. वडिलांचं वजन वापरलं नाही. आता पक्षाने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही मी निवडणूक लढत आहे. माझ्या वडिलांसोबतचे सर्व कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, असा दावा उत्पल त्यांनी केला.
अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असे विचारले असता उत्पल म्हणाले की, माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.