हिरो मोटोकॉर्पचा ब्रँड ॲम्बॅसेडर अभिनेता राम चरण 2024 Hero Glamour लॉंच करताना
ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांकडून अनेक बाईक्स लॉंच केल्या जात आहेत. या लॉंचिगमध्ये देशातील क्रमांक 1 ची कंपनी हिरो मोटोकॉर्पनेही नवीन बाईक बाजारात आणली आहे. हिरो कडून ग्लॅमरच्या नवीन एडिशनला लॉंच केले गेले आहे. ग्लॅमरला मॅटेलिक सिल्वर पेंट स्कीममध्ये लॉंच केले गेले आहे. या बाईकमध्ये काही बदल केले आहेत, रंगाचा बदल हा सर्वात प्रमुख आहे. हिरोच्या या नव्या ग्लॅमरची किंमत 83,598 हजार ते 87,598 हजार रुपयापर्यंत आहे. जाणून घेऊया नव्या ग्लॅमरबद्दल
2024 हिरो ग्लॅमर इंजिन (2024 Hero Glamour )
हिरो ग्लॅमर ही 125 cc असलेली बाईक असून जर तुम्ही त्या रेंजमधील बाईक घेण्यास इच्छुक आहात तर ही बाईक तुमच्याकरिता उत्तम पर्याय असणार आहे. इंजिन पूर्वीसारखे शक्तिशाली आहे. 2024 Hero Glamour मध्ये 124.7cc, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे, ज्या इंजिनाद्वारे 10.72bhp पॉवर आणि 10.6Nm चा पीक टॉर्क जनरेट होते. याबाईकमध्ये टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि सस्पेंशनसाठी ड्युअल रिअर शॉक आहेत. ग्लॅमरच्या टॉप-स्पेक मॉडेलमध्ये फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम ब्रेक आहेत.
हे देखील वाचा-या 5 एक्सेसरीजच्या साहाय्याने बनवा तुमच्या कारला एकदम टॉपची मॉडेल
2024 हिरो ग्लॅमर वैशिष्ट्ये (2024 Hero Glamour )
हिरो ग्लॅमरच्या वैशिष्टांबद्दल बोलायचे झाल्यास, या मॉडेलमध्ये आता एलईडी हेडलॅम्प, हॅजर्ड लॅम्प आणि स्टॉप-स्टार्ट स्विच देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे बाईकमध्ये स्मार्टफोन चार्जिंग पोर्ट उपलब्ध केले आहे. तसेच बाईक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने सुसज्ज केले आहे. बाइकची लांबी 2,051 मिमी आणि उंची 1,074 मिमी आहे. ग्लॅमर ड्रमची रुंदी 720 मिमी आहे आणि डिस्कची रुंदी 743 मिमी आहे. याशिवाय, यात 1,273 मिमी व्हीलबेस, 10 लिटर इंधन क्षमता टाकी , 180 मिमी ग्राउंड क्लिअरन्स आणि कर्ब वेट 122 किलो (ड्रम) आणि 123 किलो (डिस्क) आहे. बाईकची चाके ही 18 इंचची आहेत.
हे देखील वाचा- Hyundai Alcazar 9 सप्टेंबरला होणार लॉंच! 25 हजार रुपयांमध्ये करु शकता बुकिंग
2024 हिरो ग्लॅमरची किंमत (2024 Hero Glamour )
हिरोची ग्लॅमर ही लोकप्रिय बाईक आहे. या नव्या ग्लॅमरची किंमत ड्रम ब्रेक मॉडेलसाठी 83,598 रुपये एक्स शो रुम आणि डिस्क ब्रेक मॉडेलसाठी 87,598 रुपये एक्स शो रुम आहे. 2024 हिरो ग्लॅमर बाईकची भारतीय बाजारपेठेत मुख्य स्पर्धा ही होंडा शाइन,बजाज पल्सर 125 निऑन, TVS Ntorq, TVS Raider 125 शी असणार आहे. भारतीय ग्राहकांना या बाईकमुळे एक चांगला बजेट फ्रेण्डली पर्याय उपलब्ध झाला आहे.