फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात अनेक कार्स लाँच होत आहे. भारतीयांची वाढती मागणी बघता आता अनके कंपनीज बजेट फ्रेंडली कार्स मार्केटमध्ये आणत आहे. याचा फायदा कार उत्पादक कंपनीसोबत अनेक ग्राहकांना सुद्धा होत आहे.
प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की जेव्हा त्याने कार खरेदी करावी तेव्हा त्याने फक्त टॉप मॉडेलची कारच निवडावी. पण अनेक जण या टॉप मॉडेल कार्स महाग असल्यामुळे अनेक जण बेस मॉडेल कार्स विकत घेतात. अशा परिस्थितीत, अनेक वेळा काही जण आपल्या बेस मॉडेलमध्ये मॉडिफिकेशन्स करून टॉप मॉडेल बनवतात. हे असे करणे खूपच खर्चिक असू शकते.
हे देखील वाचा: Hyundai Alcazar 9 सप्टेंबरला होणार लॉंच! 25 हजार रुपयांमध्ये करु शकता बुकिंग
जर तुम्ही बेस मॉडेल खरेदी केले असेल आणि ते टॉप मॉडेलमध्ये अपग्रेड करायचे असेल, तर पुढे पाच ॲक्सेसरीज नमूद केल्या आहेत ज्या तुम्ही तुमच्या कारमध्ये इन्स्टॉल करू शकता. या ॲक्सेसरीज 1 लाख रुपयांपेक्षा कमी रुपयांमध्ये मिळू शकतात.
तुमच्या कारमध्ये टचस्क्रीन नसल्यास, तुम्ही ती इन्स्टॉल करून घेऊ शकता. ही सिस्टिम केवळ नेव्हिगेशन आणि मनोरंजनासाठी चांगली नाही तर कारच्या आधुनिक आकर्षणातही भर घालते. ही सिस्टिम विविध आकार आणि फीचर्ससह अनेक पर्याय बाजारात उपलब्ध असतील.
पार्किंग सुलभ आणि सुरक्षित होण्यासाठी रिव्हर्स पार्किंग कॅमेरे आणि सेन्सर खूप महत्त्वाचे असतात. या ॲक्सेसरीज सहसा बेस मॉडेलमध्ये उपलब्ध नसतात, परंतु ते स्थापित केल्याने तुमच्या कार अजूनच अत्याधुनिक होईल.
स्टीलच्या चाकांच्या जागी अलॉय व्हील्समुळे कारचे स्वरूप आणि कार्यक्षमता दोन्ही सुधारते. अलॉय व्हील्स वजनाने हलकी असतात, ज्यामुळे ते वाहनाची हाताळणी आणि मायलेज देखील सुधारतात.
लेदर सीट कव्हर्स तुमच्या कारच्या इंटीरियरला प्रीमियम लुक देतात. याशिवाय, ते आरामदायक असतात आणि कारला एक पूर्ण आणि लक्झरी लुक सुद्धा प्रदान करतात.
कारचे आतील भाग अधिक आकर्षक बनविण्यासाठी, आपण अँबीयंट लाइटिंग व्यवस्था स्थापित करू शकता. ही लाइटिंग सेटअप डॅशबोर्ड, डोअर पॅनल्स आणि फूटवेलमध्ये लावले जाऊ शकते, ज्यामुळे कारमधील वातावरण आणखी खास बनते.