
फोटो सौजन्य- official Website
भारतातल्या इलेक्ट्रीक ऑटो मार्केटमध्ये जबरदस्त स्पर्धा होणार आहे. किया या कोरियन मोटर कंपनी द्वारे त्यांची 7 सीटर इलेक्ट्रीक SUV EV9 भारतामध्ये लॉंच केली जाणार असून 3 ऑक्टोबर 2024 रोजी भारतामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. Kia EV9, इलेक्ट्रिक SUV, सीबीयू (CBU- Complete Bilt Up ) असून ती भारतामध्ये आयात केली जाणार आहे . E-GMP (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) आर्किटेक्चरवर आधारित ही कार असणार असून किया चे नवीनतम बॅटरी तंत्रज्ञान असेल.
इव्ही 9 (EV9) कारबद्दल तपशील
किया EV9 बद्दलच्या माहितीनुसार, इव्ही 9 जागतिक बाजारपेठेत तीन पॉवरट्रेन ऑफर करते: 76.1kWh बॅटरी पॅकसह सिंगल-मोटर RWD व्हेरिएंट 358 किमीची रेज देते, तर 99.8kWh बॅटरी पॅक 541 किमी रेंज देते. ड्युअल-मोटर AWD आवृत्ती सुमारे 450 किमीची रेंज प्रदान करते. ग्लोबल-स्पेक EV9 स्थिर आणि पोर्टेबल दोन्ही चार्जिंग पर्याय मिळू शकतात. जलद चार्जर वापरून फक्त 24 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज केले जाऊ शकते.7-सीटर इलेक्ट्रिक SUV मध्ये V2L (वाहन-टू-लोड) कार्यक्षमता देखील आहे.
इव्ही 9 इलेक्ट्रीक कारची वैशिष्ट्ये
कारमधील अधिक वैशिष्ट्ये म्हणजे 12.3-इंच ड्युअल स्क्रीन (ड्रायव्हर डिस्प्ले आणि इन्फोटेनमेंट सिस्टम), वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले, 14-स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टम, 5.3-इंच हवामान नियंत्रण स्क्रीन, फिंगरप्रिंट ओळख,वायरलेस फोन चार्जिंग, सी-टाइप यूएसबी पोर्ट, सभोवतालची प्रकाश व्यवस्था आणि ओटीए (ओव्हर-द-एअर) सह सुसज्ज आहे. इलेक्ट्रिक EV9 7-सीटर SUVमध्ये . पुढच्या आणि दुसऱ्या रोमधील दोन्ही सीट हीटिंग आणि वेंटिलेशनने सुसज्ज आहेत. दुसऱ्या रो मधील सीट 60:40 स्प्लिट येते ज्या फोल्ड केल्या जाऊ शकतात आणि हेडरेस्टसह स्विव्हल फंक्शनही देतात. तिसऱ्या रोमधील सीट हे 50:50 स्प्लिट रिमोट फोल्डिंग सीट असतात.
या कारमुळे इलेक्ट्रीक कारच्या मार्केटमध्ये ग्राहकांसाठी नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच या कार लॉंचिगद्वारे भारतीय इलेक्ट्रीक कार मार्केटमध्ये किया मोटर्सही आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.