फोटो सौजन्य: iStock
कार विकत घेणे सोपे असते परंतु त्यांची देखभाल करणे कठीण असते, असे आपण नेहमीच ऐकत असतो. पण या वाक्याचा प्रत्यय आपल्याला तेव्हाच येतो जेव्हा आपण कार मालक बनतो. कार जेव्हा नवीन असते तेव्हा तिच्यात जास्त खराबी येत नाही. परंतु हळूहळू जशी कार जुनी होत जाते तसे तिच्यात अनेक खराबी दिसू लागतात.
भारतात अनेक जण टू-व्हीलर मालक पुढे कार मालक होतात. ज्यामुळे कार्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. असे असतानाही अनुभवी चालकांची कमतरता आहे. दिवाळीनंतर असे अनेक वापरकर्ते असतील ज्यांनी प्रथमच कार खरेदी केली आहे. हे लोक कार चालवताना अनेक चुका करतात. त्यांच्याकडून झालेल्या किरकोळ चुकीमुळे मोठे नुकसान होते. यात कारच्या क्लच प्लेटचे नुकसान देखील समाविष्ट आहे. कारचा क्लच प्लेट खराब झाल्यास तुच्या खिश्याला हजारांची कात्री बसू शकते. म्हणूनच खाली काही टिप्स दिल्या आहेत, ज्यांना फॉलो करून तुम्ही तुमच्या कारचा परफॉर्मन्स वाढवू शकता.
हे देखील वाचा: Oben Electric कडून एक लाखाहून कमी किंमतीची ‘ही’ इलेक्ट्रिक बाईक लाँच
कार चालवताना एक पाय सतत क्लचवर ठेवण्याची सवय सोडून द्या. तुमच्या या सवयीमुळे क्लच प्लेट लवकर खराब होऊ लागते. जेव्हा गरज असेल तेव्हाच क्लच दाबा, अन्यथा तुम्हाला क्लच प्लेट वारंवार बदलत राहावी लागेल.
अनेक लोकं कार चालवताना घाई करताना दिसतात. तर काही जण गिअर्स बदलताना, क्लच प्लेट पूर्णपणे दाबण्याऐवजी अर्धी दाबतात. त्यामुळे क्लच प्लेट लवकर खराब होण्याची शक्यता वाढते. असे न केल्यास क्लच जास्त काळ काम करते.
तुम्ही कार चालवत असताना चुकूनही ब्रेक आणि क्लच एकाच वेळी दाबू नका. असे केल्यास तुमच्या कारची क्लच प्लेट खराब होण्याची शक्यता वाढते. यासोबतच तुमचे मोठे नुकसान होईल आणि खिश्याला चांगलीच कात्री लागेल. तसेच कारची क्लच प्लेट खराब झाल्यास, तुम्हाला ती तात्काळ बदलून घ्यावी लागेल.