फोटो सौजन्य: Pinterest
सध्याच्या Dominar 400 ची सुरुवातीची किंमत सुमारे 2.40 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. नवीन 350cc व्हर्जनची अधिकृत किंमत अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु GST 40% वरून 18% झाल्यामुळे ही बाईक अधिक परवडणाऱ्या दरात उपलब्ध होऊ शकते.
KTM ला धडकी भरवण्यासाठी येतेय BMW ची ‘ही’ खास Adventure Bike, अपेक्षित किंमत 4 लाख रुपये
इंजिन क्षमता कमी करण्यात आली असली तरी बाईकच्या नावात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपनीने ब्रँडची ओळख कायम ठेवण्यासाठी ‘Dominar 400’ हेच नाव कायम ठेवले आहे. सध्याच्या मॉडेलमध्ये 40PS पॉवर आणि 35Nm टॉर्क मिळतो. नवीन 350cc मॉडेलची परफॉर्मन्स माहिती अद्याप समोर आलेली नाही.
नवीन 349cc Dominar मध्ये इंजिनव्यतिरिक्त मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. यामध्ये पूर्वीप्रमाणेच सर्व प्रमुख फीचर्स दिले जाणार आहेत. बाईकमध्ये पुढील बाजूस 43mm USD फोर्क्स आणि मागील बाजूस नायट्रॉक्स मल्टी-स्टेप अॅडजस्टेबल मोनोशॉक सस्पेन्शन दिले आहे.
अवघ्या 4 सेकंदात 60 ची स्पीड, 154 KM रेज आणि बरंच काही! Royal Enfield लवकरच आणणार त्यांची E Bike
याशिवाय 17-इंचाचे व्हील्स, पुढे 110/70 आणि मागे 150/60 साइजचे ट्यूबलेस टायर्स दिले आहेत. ब्रेकिंगसाठी पुढे 320mm आणि मागे 230mm डिस्क ब्रेक मिळतात. सुरक्षिततेसाठी ड्युअल-चॅनेल ABS स्टँडर्ड फीचर म्हणून दिले आहे.






