(फोटो सौजन्य-AI एआय)
भारतात टू-व्हीलर मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या वेगाने वाढत आहे. पूर्वी ग्राहक ई-स्कूटर घेताना फक्त शहरांतर्गत वापराचा विचार करायचे, पण आता 200 किमीपेक्षा जास्त रेंज देणाऱ्या मॉडेल्समुळे इलेक्ट्रिक स्कूटर लांबच्या प्रवासासाठीही एक उत्तम पर्याय बनल्या आहेत.
200+ किमी रेंज असणाऱ्या ई-स्कूटर्स का महत्त्वाच्या आहेत?
लांब पल्ल्याची रेंज देणाऱ्या स्कूटर्समुळे वारंवार चार्जिंग करण्याची कटकट पूर्णपणे संपते. दररोज 30 ते 40 किमी प्रवास करणाऱ्या चालकांना आठवड्यातून फक्त एकदाच गाडी चार्ज करावी लागते. यामुळे “रेंज अँझायटी” (बॅटरी संपण्याची भीती) दूर होते आणि पेट्रोलच्या वाढत्या खर्चापासून मोठी मुक्ती मिळते.
TVS iQube च्या बेस व्हेरियंटमध्ये आता मोठी बॅटरी; रेंज पहिल्यापेक्षा वाढली
प्रमुख 200+ किमी रेंज स्कूटर्सची वैशिष्ट्ये
दावा केलेली रेंज VS खरी शक्य रेंज
कंपनीने सांगितलेली आयडीसी रेंज ही प्रयोगशाळेतील तपासलेली असते. रस्त्यावर प्रत्यक्ष गाड्या चालवताना रेंज थोडी कमीच मिळते.
वास्तविक रेंजवर परिणाम करणारे घटक,






