फोटो सौजन्य- iStock
सर्वसाधारणपणे आपण छोट्या रस्त्यांवर कमी वेगात बाईक चालवितो मात्र मोठे रस्ते, महामार्ग यावर बाईकचा वेग वाढवतो. पावसाळ्यामध्ये बाईक चालवताना जास्त काळजी घ्यावी लागते. खड्डे आणि गुळगुळीत रस्ते आणि दा जोरदार पावसामुळे दृश्यमानताही कमी होते. त्यामुळे बाईक चालविताना अडचणी येतात. अशा हंगामामध्ये बाईकवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशिष्ट वेगात बाईक चालविणे आवश्यक आहे. ज्याद्वारे सुरक्षितपणे प्रवास करु शकतो.
पावसाळ्यामध्ये कोणत्याही रस्त्यावर बाईक चालविताना ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने बाईक चालविणे सुरक्षित समजले जाते. ज्यामुळे वाहकाचे बाईकवर योग्य निंयत्रण राहते. ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगामध्ये तुम्ही बाईक सहजपणे थांबवू शकता अथवा तिचा वेग अजून कमी करु शकता. सरकते रस्ते आणि खड्डे यांपासूनही बचाव होतो शिवाय दृश्मानता कमी असली तरी वेग कमी असल्याने बाईक चालविणे शक्य होते.
पावसाळ्यातील बाईकचा वेग कमी ठेवण्याचे फायदे
वाढलेले नियंत्रण
कमी वेगाने बाईक चालविल्यामुळे बाईकवर अधिक नियंत्रण मिळवता येते. ओले आणि घसरडे रस्ते असताना संतुलन राखणे सोपे होते, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो.
ब्रेक लावणे सहज शक्य
कमी वेगाने चालविल्यास बाईक वेळेत थांबवणे सोपे होते. पावसामुळे ब्रेक लावण्याची क्षमता कमी होते, पण कमी वेगामुळे ही प्रक्रिया अधिक सुरक्षित होते.
रस्त्यावरील अडथळे टाळू शकता
पावसाळ्यात रस्त्यावर अचानक पाणी साचणे, खड्डे, किंवा इतर अडथळे येऊ शकतात. कमी वेगामुळे तुम्ही या अडथळ्यांना वेळीच ओळखून त्यांना चुकवू शकता.
दृश्यता अधिक सुरक्षित-
पावसाळ्यात कमी दृश्यता असताना, कमी वेगाने चालविल्यामुळे तुम्हाला रस्त्यावरची परिस्थिती आणि इतर वाहने चांगली दिसतात, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होतो.
टायर्सची चांगली ग्रीप
कमी वेगाने चालविल्यामुळे टायर्सचा रस्त्यावर चांगला ग्रीप राहतो. यामुळे हायड्रोप्लॅनिंगचा धोका कमी होतो, ज्यामुळे बाईक घसरण्याची शक्यता कमी होते.
इतर वाहनांसह सुरक्षित अंतर राखता येते
कमी वेगाने चालविल्यामुळे तुम्ही इतर वाहनांपासून सुरक्षित अंतर राखू शकता, ज्यामुळे अचानक ब्रेक लागल्यास किंवा इतर कोणत्याही परिस्थितीत तुमच्या आणि समोरील वाहनाच्या दरम्यान पुरेसे अंतर राहते.
सुरक्षित वळण घेता येऊ शकते
पावसाळ्यात रस्त्यावरुन वळण घेताना बाईक घसरण्याचा सर्वात जास्त धोका असतो. कमी वेगाने वळल्यास बाईकवर नियंत्रण ठेवणे सोपे होते, ज्यामुळे घसरण्याचा धोका कमी होतो.
इंधनाची बचत
कमी वेगाने चालविल्यामुळे इंधनाची बचत होते. पावसाळ्यात ट्रॅफिक जास्त असल्यामुळे कमी वेगाने चालविल्यास तुमच्या बाईकचे इंधन कमी खर्च होते.
कमी वेगाने बाईक चालवल्यामुळे पावसाळ्यातील रस्त्यांच्या आव्हानांशी अधिक सुरक्षितपणे सामोरे जाणे शक्य होते, ज्यामुळे तुम्ही स्वतःची आणि इतरांची सुरक्षा सुनिश्चित करू शकता. अपघातापासूनही दुर राहता.