फोटो सौजन्य- iStock
Nissan कंपनीने सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी बंपर ऑफर आणली आहे. Nissan Magnite फेसलिफ्ट मॉडेलचे आताच भारतामध्ये लॉंचिंग केले गेले मीडिया रिपोर्ट्नुसार, या कारवर कंपनीने तब्बल 60 हजार रुपयापर्यंत सवलत दिली आहे. मॅग्नाइट फेसलिफ्ट SUV ची एक्स शो रुम किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते. ही सवलत एका डीलरकडून दुसऱ्या डीलरमध्ये बदलते.
निसान मॅग्नाइट या मॉडेल्सवर ही सवलत असून त्यामध्ये रोख सवलत, एक्सचेंज फायदे, कॉर्पोरेट आणि लॉयल्टी बोनस यांचा समावेश आहे. कारच्या एंट्री आणि मिड-लेव्हल वेरिएंटवरील फायदे हे 50 हजार रुपयांपर्यंत आहेत. तर उच्च- सवलत ही 60,000 रुपयांपर्यंत आहे. निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट मॉडेलचे टॉप व्हेरिएंट हे सध्या 11.50 लाख रुपयांना उपलब्ध आहे. निसान मॅग्नाइटच्या ट्रिम्स Visia, Acenta, N-Connecta आणि Tekna म्हणून ओळखल्या जातात.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट (Nissan Magnite Facelift)
या कारमध्ये कंपनीने बाहेरील भागात विस्तीर्ण आणि मोठ्या लोखंडी जाळीच्या स्वरूपात मुख्य बदल केले आहेत.त्यात अधिक क्रोम आणि ग्लॉस-ब्लॅक घटक आहेत. फॉक्स स्किड प्लेट ही या कारमध्ये फॉग लॅम्पसह एकत्रित केल्यामुळे अधिक ठळक झाली आहे. मॅग्राईटमध्ये LED DRL सह हेडलॅम्प देखील थोडे रीफ्रेश केले आहेत. तर कारवर L-shaped LED DRL अजूनही आहे. कारचे प्रोफाइल सारखेच असले तरी टायर प्रोफाइल 16-इंच आहे. ग्राहकांना नवीन सनराइज कूपर कलर शेड देखील मिळते.
निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट (Nissan Magnite Facelift) इंजिन
कारमध्ये दोन 1.0-लिटर पेट्रोल इंजिन पर्याय मिळतात. NA प्रकार 72hp कमाल पॉवर आणि 96Nm कमाल टॉर्क निर्माण करतो. दुसरीकडे, टर्बो आवृत्ती 100hp कमाल पॉवर आणि 160Nm कमाल टॉर्क निर्माण करते. गियर पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल, AMT आणि CVT समाविष्ट आहे.
कारमधील सुरक्षा वैशिष्ट्ये
सुरक्षिततेच्या दृष्टीने कारमध्ये , सहा एअरबॅग्ज, व्हेईकल डायनॅमिक कंट्रोल (VDC), इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि हिल स्टार्ट असिस्टसह अपग्रेड केलेले आहेत. तसेच, मग्राइटमध्ये मध्ये आता टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), चाइल्ड सीटसाठी ISOFIX माउंट्स आणि आपत्कालीन स्टॉप सिग्नल समाविष्ट आहे. EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि हायड्रॉलिक ब्रेक असिस्ट असणार आहेत.
त्यामुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांसाठी सवलतीमध्ये कार खरेदी करण्याची चांगली संधी निसानकडून देण्यात आली आहे.