फोटो सौजन्य - Social Media
टाटा पंचला टफ फाईट देण्यासाठी सिट्रॉन इंडिया सज्ज आहे. नुकतेच, सिट्रॉन इंडियाने आपली नवीकोरी कर मॉडेल C3 लॉन्च केली आहे. ही ऑटोमॅटिक कार असून या गाडीची मोठी प्रतीक्षा पाहिली जात होती. अखेर, सिट्रॉन इंडियाची C3 ऑटोमॅटिक कार गाड्यांचे शौकीन असणाऱ्या लोकांच्या भेटीला आली आहे. या कारची किंमत ९.९९ लाख रुपयांपासून ते १०.२७ लाख रुपयांपर्यंत ठेवले आहे. ही या गाडीची एक्स शोरूम किंमत आहे. महत्वाची बाब म्हणजे या कारमध्ये फक्त १.२ लिटर तसेच ३ सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. या पावरफुल इंजिनसह कारला ११० PS पावर आणि 205 Nm टॉर्क मिळतो. या कारमध्ये ६ स्पीड ऑटोमॅटिक गेअरबॉक्स देण्यात आले आहे, जी या गाडीला एका विशेष रूप प्रदान करते.
हे देखील वाचा : ओबेन इलेक्ट्रिकची दसऱ्यानिमित्त धमाका ऑफर; रोरच्या खरेदीवर करा ६०,००० रुपयांची बचत
C3 च्या शाइन व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये आहे. C3 च्या शाइन वाइब पॅकची किंमत 10.12 लाख रुपये आहे, तर C3 च्या शाइन ड्युअल टोनची किंमत 10.15 लाख रुपये आहे. विशेष गोष्ट म्हणजे C3 च्या शाइन ड्युअल टोन वाइब पॅकची किंमत 10.27 लाख रुपये आहे. ड्युअल टोन व्हेरिएंटमध्ये टू-टोन एक्सटीरियर डिझाईन देण्यात आले आहे. महत्वाची बाब अशी आहे कि वाइब पॅकमध्ये काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत.
हे देखील वाचा : नवीन कारचे पॉलिथिन कव्हर किती दिवसांत काढावे? सोप्या प्रश्नाचे महत्वपूर्ण उत्तर जाणून घ्या.
सिट्रॉन इंडियाने C3 ऑटोमॅटिक कारमधून जबरदस्त फीचर्स देण्याचे प्रयत्न केले आहे, आणि अर्थातच ते ग्राहकांना पसंतीस येणार आहेत. तसेच आकर्षणाचा मुख्य केंद्र ठरत आहेत. C3 मध्ये प्रोजेक्टर LED हेडलाइट्स दिले आहेत. त्याचबरोबर विंग मिररवर इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्स आणि ऑटो-फोल्डिंग ORVMs दिले आहेत. इंटिरिअरमध्ये 7 इंचाचा डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे. 10.2 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल दिले आहेत. सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्स, ESP, TPMS, हिल होल्ड असिस्ट दिले आहेत. तसेच ABS, EBD, आणि रियर पार्किंग सेन्सर यांसारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत, जेणेकरून आतील प्रवासी सुखरूप आणि सुरक्षित राहतील. कंपनीने C3 ऑटोमॅटिकची बुकिंग सुरू केली असून, लवकरच त्याची डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे.