Car Buying Guide: नवीन गाडी खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा, या गोष्टी लक्षात ठेवा नाही तर रिकामा होईल खिसा
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे केवळ दिखाव्यासाठी किंवा दुसऱ्यांचे बघून गाडी खरेदी करू नका. गाडी खरेदी करताना विचाार करा की, रोज किती प्रवास करावा लागणार आहे, तुमच्या कुटूंबात किती माणसं आहेत आणि तुम्हाला कोणत्या गाडीची गरज आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून कोणते कार मॉडेल खरेदी करायचे आहे, याचा निर्णय घ्या. शोरुममध्ये सहसा अशा काही गोष्टी सांगितल्या जातात ज्यामुळे ग्राहक गोंधळतात आणि जास्तीचा खर्च करतात. उदाहणार्थ, मेजर सर्विसच्या नावाखाली ग्राहकांकडून जास्तीचे पैसे उकळले जातात. पण गाडी खरेदी करताना नेहमी लक्षात ठेवा की, कंपनी जे सर्विस शेड्यूल देते, तेच योग्य असते. तुम्ही हे शेड्यूल फॉलो करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
किंमतीच्या बाबतीत बोलायचं झालं तर केवळ गाडीची एक्स-शोरूम किंमत पाहून आनंदी होऊ नका. कारण ऑन-रोड किंमत समोर आल्यानंतर तुम्हाला खऱ्या खर्चाबाबत समजते. यामध्ये इंश्योरेंस, आरटीओ आणि एक्सेसरीज सारख्या अनेक वस्तूंचे चार्जेस जोडले जातात. त्यामुळे नेहमी एक्स-शोरूम किंमत आणि ऑन-रोड किंमत जाणून योग्य निर्णय घ्या.
अनेकांना वाटतं की, शोरूममधून इंश्योरेंस खरेदी केल्सास आपल्याला फायदा होऊ शकतो. पण जर तुम्ही ऑनलाईन वेगवेगळ्या कंपन्यांद्वारे ऑफर केल्या जाणाऱ्या इंश्योरेंसची तुलना केली तर तुम्हाला आणखी चांगला पर्याय मिळू शकतो. तसेच शोरूममध्ये मिळणाऱ्या गाडीच्या एक्सेसरीजची किंमत देखील अवाढव्य असते, ज्यामुळे तुमच्या खिशावर ताण येतो. त्यामुळे अनेक लोकं बाहेरुन गाडीच्या एक्सेसरीज खरेदी करण्यावर अधिक भर देतात, ज्यामुळे खर्च कमी होतो.
रेंजच्या बॅटरीत Tata Sierra EV सगळ्या गाडयांना मागे सोडणार? लाँच होण्याअगोदर जाणून घ्या ‘ही’ माहिती
गाडी खरेदी करताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे PDI म्हणजेच प्री-डिलीवरी इंस्पेक्शन. याचा अर्थ असा आहे की, गाडी खरेजी करण्यापूर्वी योग्य प्रकारे तपासा. गाडीवर कोणताही स्क्रॅच, डॅमेज किंवा ओरखडा नाही ना याची खात्री करा. अनेकदा लोकं न बघता गाडीची खरेदी करताना आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट टेस्ट ड्राइव विसरु नका. टेस्ट ड्राइव केल्याशिवाय कोणतीही गाडी खरेदी करू नका.






