फोटो सौजन्य-iStock
ज्यावेळी आपण कार विकत घेतो त्यावेळी कारची किंमत, मायलेज आणि महत्वाचे म्हणजे कारच्या वैशिष्टांनाही महत्व दिले जाते. कारचे प्रत्येक मॉडेल गणिक अपडेट होत असतात. ज्याबद्दल माहिती कंपन्यांकडून दिली जात असते.कारची वैशिष्ट्ये ही तुमचा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी अपडेट केली जात असतात. मात्र कारमध्ये अनेक अशी हिडन वैशिष्ट्ये आहेत ज्याबद्दल बहुतेक लोकांना माहिती नसते, परंतु जर ते योग्यरित्या वापरले गेले तर ते तुम्हाला ड्रायव्हिंगचा अधिक चांगला अनुभव मिळू शकतो. सुरक्षिततेसाठी ही वैशिष्ट्ये माहित असणे आवश्यक आहे.
‘ही’ आहे कारमधील प्रमुख माहित नसलेली वैशिष्ट्ये
ॲडजस्टेबल स्टीयरिंग व्हील: अनेक कारमध्ये स्टीयरिंग व्हील अप-डाउन किंवा इन-आउट करता येते. यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार ड्रायव्हिंग पोझिशन सेट करता येतो ज्याचा फायदा म्हणजे तुम्हाला लांबच्या प्रवासात आराम मिळतो.
क्रूझ कंट्रोल: क्रुझ कंट्रोलमुळे गाडी चालवताना तुमच्या कारचा वेग एका ठराविक पातळीवर सेट करता येते, ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ ड्रायव्हिंग करताना ॲक्सिलरेटरचा वारंवार वापर करावा लागणार नाही. मुख्यत: महामार्गावर याचा वापर केला जातो.
रीअर-व्ह्यू मिरर डिमिंग: कार चालवताना रात्रीच्या वेळी मिररमध्ये पाहिल्यास थेट डोळ्यावर प्रकाश पडतो आणि मागची गाडी पाहताना डोळ्यांना त्रास होतो मात्र काही रिअर-व्ह्यू मिररमध्ये ऑटो-डिमिंग वैशिष्ट्य असते, जे रात्रीच्या वेळी मागून येणारा तेजस्वी प्रकाश कमी करते आणि तुमच्या डोळ्यांना आराम देते.
स्वयंचलित हेडलाइट्स: अनेक कारमध्ये, हेडलाइट्स या स्वयंचलित मोडवर सेट केल्या जाऊ शकतात, या मोडमुळे हेडलाइट्स अंधारामध्ये स्वयंचलितपणे चालू होतात आणि जेव्हा प्रकाश असतो त्यावेळी आपोआप बंद होतात.
टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS): या कारमधील यंत्रणेमुळे टायमधील हवेचा दाब कळतो आणि जर टायरमध्ये हवेचा दाब कमी झाल्यास तुम्हाला इंडिकेटरद्वारे सतर्क केले जाते.
ग्लोव्ह बॉक्समध्ये कूलिंग फीचर: बहुतांश कारमध्ये, ग्लोव्ह बॉक्समध्ये एअर कंडिशनिंग सिस्टमचे कूलिंग फीचर असते, ज्यामुळे तुम्ही तुमचे पेय थंड ठेवू शकता.
या वैशिष्टांमुळे तुमचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुकर होतो. तसेच प्रवासादरम्यान सुरक्षितेसाठी ही वैशिष्ट्ये कार्य करतात.