फोटो सौजन्य- iStock
प्रत्येकजण आपल्या बाईक आणि स्कूटरबद्दल जाणून असतो. दुचाकी चालविल्यानंतर आपल्या दुचाकीचा अंदाज येतो. त्या वाहनामध्ये कोणते चांगले घटक असून बाईक अथवा स्कूटर काय केले तर समस्या येते याचाही काहीप्रमाणात अंदाज वाहनमालक लावू शकतो. परंतु काही छोट्या गोष्टी असतात ज्याच्यामध्ये बदल केला तर त्याचा बाईक अथवा स्कूटरसाठी खूप जास्त फायदा होतो. बऱ्याचदा लोक सकाळी बाईक स्टार्ट करतात आणि तात्काळ प्रवास सुरु करतात, मात्र असे केल्याने ते एक छोटीशी चूक पुन्हा पुन्हा करत आहेत. ज्यामुळे बाइकच्या इंजिनचे आयुष्य कमी होते. त्यामुळे बाईक वॉर्म अप महत्वाचे ठरते तर जाणून घेऊया याबद्दल
बाईक स्टार्ट करुन लगेच चालवण्याची सवयीमुळे होऊ शकते मोठे नुकसान
बाईक दिवसातून पहिल्यांदा स्टार्ट केली जाते, गियर टाकले जातात आणि तात्काळ निघणे होते. ही बहुतांश जणांची नित्याची सवय असते परंतु जर बाईकच्या सर्वात महत्वाचा पार्ट असणाऱ्या इंजिनच्या दृष्टीने पाहिल्यास आपण हे करु नये. कारण बाईक सुरू होताच स्टार्ट केल्याने किंवा जास्त रेसिंग केल्याने इंजिन खराब होते. हे नुकसान लगेच होत नाहीत मात्र काही कालावधीनंतर त्यासंबंधी समस्या सुरु होऊ शकतील
बाईक स्टार्ट करताच केवळ 10 सेकंद हे काम करा
बाईक जेव्हा स्टार्ट केली तर ती लगेच चालवण्याऐवजी काही वेळासाठी वॉर्म अप करावी. हा वार्मअपचा कालावधी केवळ 10 सेंकद असला तरी पुरेसा आहे. वार्म अप करताना जास्त रेस करू नये. बाइक सुरू केल्यानंतर, तुम्हाला ती त्याच्या निष्क्रिय RPM ( Revolutions Per Minute), वर सोडावी लागेल.
बाइक वॉर्म-अपचे फायदे
बाईकच्या दीर्घ आयुष्यासाठी बाईक मॅकेनिक अथवा बाईकचे स्पेशालिस्ट इंजिनला थोडा वेळ गरम करण्याची शिफारस करतात. जेव्हा बाईक बराच एका जागी उभी राहते त्यावेळी इंजिन ऑइल हे इंजिनमध्ये एका ठिकाणी जमा होते. यामुळे, इंजिनच्या भागांचे लुब्रिकेशन (वंगण) कमी होते. अशा परिस्थितीत जर बाईक लगेच स्टार्ट केली आणि चालवली तर त्याचा पार्ट्सवर थेट परिणाम होतो. त्यामुळे जर तुम्ही बाईक सुरू केली आणि ती काही काळ सोडली तर पार्ट्सचे लुबिक्रेशन पूर्ववत होते. थंड हवामानात असतानाही बाईक असूदे अथवा कार स्टार्ट करुन काही काळ वॉर्म अप करणे आवश्यक कारण थंड हवामानात इंजिन तेल घट्ट होते.