इलेक्ट्रिक वाहनांमुळे ऑटो डीलर्सच्या कमाईवर परिणाम; वाढता खर्च आणि कमी सर्व्हिस उत्पन्नामुळे चिंता

इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे भारतातील ऑटो डीलर्सच्या सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्ट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. वाढता व्यवसाय खर्च, कर्जाचे हप्ते आणि शोरूममधील वाहनांचा साठा यामुळे डीलरशिपच्या नफ्यावर दबाव निर्माण झाला आहे.
EV Growth Puts Pressure on Auto Dealers
EV Growth Puts Pressure on Auto Dealers (फोटो सौजन्य-AI एआय)
Published on: 
Updated on: 
  • इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे डीलर्सचे सर्व्हिसिंगमधील उत्पन्न कमी होत आहे.

  • ऑक्टोबरमध्ये पॅसेंजर वाहनांचा साठा 43 ते 45 दिवसांवर पोहोचला.

  • वाढता कर्जखर्च आणि नवीन गुंतवणुकीमुळे डीलर्सच्या नफ्यावर दबाव वाढतोय.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत असताना ऑटोमोबाईल डीलर्ससमोर आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. इलेक्ट्रिक वाहनांमुळे ट्रेडीशनल सर्व्हिसिंग आणि स्पेअर पार्ट्समधून मिळणारे उत्पन्न कमी होत आहे. दुसरीकडे, वाढता बिझनेस खर्च, कर्जावरील व्याज आणि वाहनांचा साठा सांभाळण्याचा खर्च यामुळे डीलरशिपच्या नफ्यावर परिणाम होत आहे. सणासुदीच्या काळात वाहन विक्रीत चांगली वाढ झाली असली तरी डीलर्सच्या प्रत्यक्ष कमाईबाबत चिंता कायम आहे.

EV Growth Puts Pressure on Auto Dealers
भारतात Electric Vehicle Sales मध्ये 45% वाढ! ऑक्टोबरमध्ये 3,54,625 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री

इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत 52.62% वाढ

हिंदू बिझनेसलाइनच्या रिपोर्टनुसार, इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापरामुळे डीलर्सच्या उत्पन्नाचे पारंपरिक गणित बदलत आहे. फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (FADA) च्या आकडेवारीनुसार, 11 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर या 42 दिवसांच्या सणासुदीच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या रिटेल विक्रीत वर्षभराच्या तुलनेत 52.62% वाढ होऊन हा आकडा 5.10 लाख युनिट्सवर पोहोचला.

याच काळात इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत 61.10% आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 72.91% वाढ झाली. FADA चे माजी अध्यक्ष विंकेश गुलाटी यांच्या मते, इलेक्ट्रिक वाहनांसाठी डीलर्सना नवीन सर्व्हिस सुविधा आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर गुंतवणूक करावी लागत आहे. पण या वाहनांमधून नियमित सर्व्हिसिंगचे उत्पन्न कमी मिळते. त्यामुळे वाहन उत्पादकांनी प्रत्येक वाहनाच्या संपूर्ण आयुष्यातून डीलर्सना मिळणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून मार्जिन ठरवावे.

वाहन विक्रीत वाढ, पण सर्व सेगमेंटमध्ये सारखी स्थिती नाही

FADA चे अध्यक्ष साई गिरिधर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सणासुदीच्या 42 दिवसांत एकूण वाहनांच्या रिटेल विक्रीत 2.21% वाढ होऊन 55.25 लाख युनिट्सची विक्री झाली. पण पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत 7.16% घट होऊन हा आकडा 7.49 लाख युनिट्सवर आला. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात 50.41% डीलर्सना विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. तर 40.08% डीलर्सना विक्री स्थिर राहील आणि 9.50% डीलर्सना घट होईल असे वाटते.

EV Growth Puts Pressure on Auto Dealers
Mahindra Vision S SUV 2027 मध्ये होणार लाँच! स्कॉर्पिओ एनसारखा लूक आणि खास फीचर्सची झलक

वाहनांचा साठा आणि कर्जाचा खर्च वाढतोय

डीलर्ससमोर आणखी एक अडचण म्हणजे शोरूममध्ये विक्री न झालेल्या वाहनांचा साठा. ऑक्टोबरमध्ये पॅसेंजर वाहनांचा साठा 43 ते 45 दिवसांपर्यंत होता. FADA च्या मते, हा साठा 21 दिवसांच्या शिफारस केलेल्या पातळीवर असणे योग्य आहे. डिसेंबरअखेर तो 30 दिवसांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.

सर्वेक्षणातील सुमारे 31% डीलर्सनी वाढत्या कर्जाच्या खर्चाचा आणि हप्त्यांचा व्यवसायावर परिणाम होत असल्याचे सांगितले. त्यामुळे वाहन प्रोडक्शन कंपन्यांसमोर डीलर्सना आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवण्याचे आव्हान आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा विस्तार करताना डीलर्सनाही योग्य उत्पन्न मिळेल, अशी व्यवस्था तयार करणे गरजेचे बनले आहे.