फोटो सौजन्य: Freepik
सध्या भारतीय मार्केटमध्ये अनेक बाईक्स लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक बाईक्स सुद्धा मोठ्या प्रमाणात लाँच होत आहे. त्यामुळेच सध्या अनेक जण बाईक विकत घेण्याचा विचार करत आहे.
बाईक चालवण्यात एक वेगळी थ्रिल असते. सध्या पावसाळ्यचे दिवस चालू झाले आहेत. अनेक जणांचे यावेळी बाहेर फिरायचे प्लॅन्स बनत असतात.जर तुम्ही सुद्धा अशा मोसमात आपल्या बाईकवर फिरायचा प्लॅन बनवत आहात तर तुम्हाला बाईकमधील एमरजन्सी इंडिकेटर्सची माहिती असणे फार गरजेचे आहे.
अनेक जण रोज आपल्या बाईकने फिरत असतात. पण त्यांना बाईकमधील एमरजन्सी इंडिकेटर्सची माहितीच नसते. हे इंडिकेटर्स एक प्रकारचे सेफ्टी फीचर्स आहेत जे आपल्याला बाईकमधील समस्यांविषयी आधीच सूचित करत असतात. जर हे इंडिकेटर स्पीडोमीटरवर ब्लिंक होत असतील तर तुम्ही ताबडतोब सावध व्हावे. चला आपण काही मुख्य एमरजन्सी इंडिकेटर्स बद्दल जाणून घेऊया.
बाईकच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यास हा इंडिकेटर ब्लिंक होत असतो. जर हा इंडिकेटर सतत ब्लिंक होत असडेल तर तुम्ही तुमची बाईक ताबडतोब सर्व्हिस सेंटरमध्ये नेली पाहिजे.
हा सिग्नल इंजिनमध्ये ऑईलचे प्रमाण कमी असल्याचे किंवा दाब योग्य नसल्याचे सूचित करतो. अशा परिस्थितीत तुम्ही बाईक थांबवून लगेच ऑइल तपासले पाहिजे.
हे देखील वाचा: August 2024 मध्ये वाहनांच्या विक्रीत घट? FADA ने सादर केला रिपोर्ट
जेव्हा इंजिनचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते तेव्हा ते इमर्जन्सी इंडिकेटर लुकलुकते. यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते. या परिस्थितीत, बाईक थंड होऊ द्या आणि नंतर ती स्टार्ट करा.
हे सूचक बॅटरी चार्जिंगशी संबंधित समस्या सूचित करते. जर बॅटरी चार्ज होत नसेल तर बाइक सर्व्हिस सेंटरमध्ये नेली पाहिजे.
काही नवीन बाईक्समध्ये हे वैशिष्ट्य आहे, जे टायरच्या हवेच्या दाबावर लक्ष ठेवते. जर दाब कमी असेल तर हा इंडिकेटर ब्लिंक होऊ शकतो.
हे ब्रेक सिस्टीममधील बिघाडाचे संकेत आहे. अशा परिस्थितीत बाईक चालवणे सुरक्षित नसून, त्याची त्वरित सर्व्हिसिंग करावी किंवा नजीकच्या मेकॅनीकडे आपली बाईक घेऊन जावी.
याएमरजन्सी इंडिकेटर्सकडे योग्य वेळी लक्ष देणे आपल्या सुरक्षिततेसाठी फार महत्वाचे आहे.