फोटो सौजन्य- iStock
नवीन कार असताना अत्यंत चांगले मायलेज मिळते मात्र कार जुनी झाल्यानंतर मायलेज कमी होते अशी तक्रार अनेकांची असते मात्र कार नवी असो अथवा जुनी कारचे मायलेज वाढविणे सहज शक्य आहे. महत्वाचे म्हणजे प्रत्येक कारमध्ये त्यासंबंधी एक जादुई वैशिष्ट्य असते. फक्त त्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. हे फीचर आहे क्रुझ कंट्रोल (Cruise Control). या फीचरद्वारे तुम्ही कारचे मायलेजमध्ये वाढ करु शकता.
क्रुझ कंट्रोल काय करते?
वेग स्थिर ठेवणे: क्रूझ कंट्रोल तुमच्या कारचा वेग अतिशय स्थिर ठेवते, यामुळे इंजिनवर वारंवार वेग वाढवण्याचा अथवा कमी करण्याचा दबाव पडत नाही. ज्याचा परिणाम इंधनाच्या वापरावर होतो.
इंधन बचत: जेव्हा वेग स्थिर असतो, तेव्हा इंजिनला योग्य स्तरावर काम करणे शक्य होते आणि परिणामी इंधनाचा वापर कमी होतो आणि मायलेज चांगले होते.
ड्रायव्हरचा प्रवास अधिक आरामदायी बनतो: जेव्हा क्रूझ कंट्रोल सक्रिय जाते, तेव्हा ड्रायव्हरला एक्सीलरेटर पाय ठेवण्याची गरज नसते. ज्यामुळे आरामशीर ड्रायव्हिंग करता येते.
लाँग ड्राईव्हमध्ये अत्यंत फायदेशीर ठरते : महामार्गावर किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासावर, जेथे व्यत्यय कमी असतो, क्रूझ कंट्रोल वापरल्याने कार इंधन-कार्यक्षम बनते.
ओव्हरस्पीडिंगला प्रतिबंध: क्रूझ कंट्रोलचे सर्वात मोठे कार्य म्हणजे कार ओव्हरस्पीडिंग होत नाही. ज्यामुळे इंजिनचा ताण कमी होतो आणि इंधनाचा वापर कमी होतो. तसेच वाहन सुरक्षितता राहते.
हवेचा प्रतिकार नियंत्रण: सतत योग्य वेगात गाडी चालवल्याने हवेच्या प्रतिकाराचा प्रभाव कमी होतो, त्यामुळे मायलेज सुधारते.
हायब्रीड आणि इको मोडसह कार्य: कारमध्ये हायब्रीड किंवा इको मोड असल्यास, हे मोड क्रूझ कंट्रोलसह अजून प्रभावी होतात, ज्यामुळे मायलेज वाढते.
वेगातील चढ उतार कमी करते: क्रूझ कंट्रोल नसल्यास वाहन वेगात चालवताना वारंवार चढ-उतार होतात, ज्यामुळे इंधनाचा वापर अधिक होतो. मात्र क्रूझ कंट्रोल हे कमी करते.
वाहतुकीनुसार वेगाचे समायोजन: आता बऱ्याच वाहनांमध्ये नवीन क्रूझ नियंत्रण आहे, जे वाहतुकीनुसार वेग समायोजित करते. यामुळे रहदारीतही इंधनाची योग्य बचत होते.
दीर्घकालीन पैशाची बचत: क्रुझ कंट्रोलमुळे इंधनाचा वापर कमी होतो आमि तुमच्या खिशावरचा भारही कमी होतो, ज्यामुळे दीर्घकालीन बचत होते.
तुमच्या कारमध्ये क्रूझ कंट्रोल हे फीचर असल्यास, त्याचा योग्य वापर करा, ज्यामुळे तुम्हाला मायलेजसाठी फायदेशीर ठरेल शिवाय ड्रायव्हिंग ही आरामदायी असेल.