फोटो सौजन्य- Official Website
भारतामध्ये सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. नवरात्र येत्या दोन दिवसांमध्ये सुरु होणार आहे. त्यामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्येही सर्वच कंपन्या कार लॉंचिग करत आहेत तसेच नवीन एडिशन बाजारात आणत आहेत. त्यावर मोठमोठ्या ऑफर्सही दिल्या जात असून ग्राहकांना कार खरेदीसाठी आकर्षित केले जात आहे.
या नवीन कार लॉंचिगमध्ये निसान कंपनीकडून भारतात शुक्रवार दि. 4 ऑक्टोबर, 2024 रोजी मॅग्नाइटची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करणार आहे. या कारच्या अधिकृत लॉंचिगपूर्वी , कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर मॅग्नाइट फेसलिफ्टसाठी बुकिंग सुरु केले आहे. ग्राहक डीलरशिपद्वारेही निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट देखील बुक करू शकतात. कार लॉंच झाल्यानंतर पुढील दिवशी म्हणजे 5 ऑक्टोबर 2024 वितरण सुरू होण्याची घोषणा करण्यात आली आहे.
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Nissan Magnite Facelift ची डिझाईन
मॅग्नाईट फेसलिफ्टच्या बाह्य रचनेत पुढील आणि मागील प्रोफाइलमधील काही सुधारणा केल्या आहेत बाकी इतर बहुतेक घटक हे सध्याच्या मॉडेलप्रमाणेच असेल. कारच्या पुढील बाजूच्या बदलांमध्ये स्लीकर लूकसह पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल आणि सुधारित एलईडी हेडलॅम्प आणि अपडेट केलेल्या एलईडी डीआरएलचा समावेश असणार आहे. कारच्या बंपरमध्ये काही बदल देखील केले जाणार आहेत. कारच्या मागील बाजूचे प्रोफाइल नवीन बंपर आणि टेललॅम्पसह अपडेट केले जाईल. मात्र, कंपनीने कारच्या साइड प्रोफाइलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. नवीन अलॉय व्हीलसह ते अपग्रेड केले जाईल.
Nissan Magnite Facelift ची वैशिष्ट्ये
कारच्या केबिनच्या आत मोठा इन्फोटेनमेंट सिस्टम असेल, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि यासोबतच सनरूफसह अपडेट केले जाण्याची शक्यता आहे. मॅग्नाईट फेसलिफ्टमध्ये अपेक्षित असलेले इतर बदलांंमध्ये एक नवीन इंटिरियर थीम असेल त्याचसोबत या कारमध्ये पुनर्रचना डॅशबोर्ड लेआउट असणार आहे.
Nissan Magnite Facelift इंजिन
निसान मॅग्नाइट फेसलिफ्टमध्ये ऑफर केल्या जाणाऱ्या पॉवरट्रेन पर्यायांमध्ये सध्याच्या मॉडेलमध्ये असलेले 1.0-लिटर एनए पेट्रोल आणि 1.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे. कारचे मोटर पर्याय पाच-स्पीड मॅन्युअल, AMT आणि CVT युनिट पर्यायांसह उपलब्ध असतील.
निसान मॅग्नाइट ही देशामध्ये उपलब्ध असलेली सर्वात स्वस्त SUV आहे. या कारची एक्स शो रुम किंमत ही 6 लाखापासून सुरु होते. त्यामुळे फेसलिफ्ट एडिशनची सुरुवात ही 6 लाखाच्या काही अंशी वर असू शकते. निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये Mahindra XUV 3XO, Renault kiger, Kia Sonet, Hyundai Venue, Tata Nexon, आणि Citroen Basalt यांच्याशी स्पर्धा करणार आहे.