फोटो सौजन्य: YouTube
गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाचा आवडता सण. आता गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. अनेक घरात बापाच्या आगमनाची तयारी खूप उत्सहाने केली जात आहे. अनेक या शुभमुहूर्तावर गणरायाचे दर्ह्सणं नवीन कामांना सुरुवात करतात तर काही जण एखादी नवी गोष्ट घरात आणतात. कित्येक जण तर याच शुभमुहूर्तावर आपल्या हक्काची नवीन बाईक किंवा स्कुटर विकत घेतात.
जर तुम्ही सुद्धा यंदाच्या गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कुटर घेण्याच्या तयारीत आहात तर ही बातमी खास तुमच्यासाठीच आहे. भारतातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी यामाहा आपल्या बाईक्स आणि स्कुटर्स विशेष ऑफर्स देत आहे. चला या ऑफरबद्दल जाणून घेऊया.
गणेश चतुर्थी उत्सव अधिक जल्लोषात साजरा करण्यासाठी यामाहा मोटर इंडियाने महाराष्ट्र राज्यातील ग्राहकांसाठी स्पेशल ऑफर्सची घोषणा केली आहे. १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वैध असलेल्या या विशेष ऑफर्स सध्या यामाहाची १५० सीसी एफझेड मॉडेल श्रेणी आणि १२५ सीसी एफआय हायब्रिड स्कूटर्सवर लागू आहेत.तुम्ही या ऑफरचा लाभ तुमच्या जवळील किंवा यामाहाच्या अधिकृत शोरूममधून मिळवू शकता. चला पाहून घेण्यात कोणत्या बाईक्स आणि स्कुटर्सवर ही ऑफर उपलब्ध आहे.
1.एफझेड-एस एफआय व्हर्जन 4.0 डीएलएक्स, एफझेड-एस एफआय व्हर्जन 4.0, एफझेड-एस एफआय व्हर्जन 3.0 , एफझेड एफआय या वेईकल्सवर 3000 रूपयांची कॅशबॅक आणि 5999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.
2.एफझेड-एक्सवर 5000 रूपयांची कॅशबॅक आणि 5999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.
3.फॅशिनो 125 एफआय हायब्रिड / रेझेडआर 125 एफआय हायब्रिडवर 2000 रूपयांची कॅशबॅक आणि 2999 रूपयांचा लो-डाऊन पेमेंट मिळेल.
हे देखील वाचा:Zelio E Bikes कडून ‘या’ स्कुटर्स लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
यामाहाच्या पोर्टफोलिओमध्ये पुढील व्हेइकल्सचा समावेश आहे. यात वायझेडएफ-आर३ (321 सीसी), एमटी-०३ (३२१ सीसी), वायझेडएफ-आर१५एम (155 सीसी), वायझेडएफ-आर१५ व्ही४ (155 सीसी), वायझेडएफ-आर१५एस व्ही३ (155 सीसी), एमटी-१५ व्ही२ (155 सीसी); एफझेड-एस एफआय व्हर्जन 4.0 (149 सीसी), एफझेड-एस एफआय व्हर्जन ३.० (149 सीसी), एफझेड एफआय (149 सीसी), एफझेड-एक्स (149 सीसी) आणि स्कूटर्स जसे ऐरॉक्स 155 व्हर्जन एस (155 सीसी), ऐरॉक्स 155 (155 सीसी), फॅशिनो एस 125 एफआय हायब्रिड (125 सीसी), फॅशिनो 125 एफआय हायब्रिड (125 सीसी), रेझेडआर 125 एफआय हायब्रिड (125 सीसी) आणि रेझेडआर स्ट्रीट रॅली 125 एफआय हायब्रिड (125 सीसी).